सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:06 IST2021-09-24T04:06:11+5:302021-09-24T04:06:11+5:30

वैजापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

Pave the way for co-operative elections | सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

वैजापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. २५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांसह सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, कर्मचारी पतसंस्था अशा विविध संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू होणार आहे.

३१ डिसेंबर २०२२ अखेर वैजापूर तालुक्यातील विविध प्रकारच्या २०२ संस्थांच्या निवडणुकांची मुदत संपलेली असेल. राज्य सरकारने कोरोनामुळे यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुका सहा वेळा पुढे ढकलल्या होत्या. एप्रिल महिन्यात काढलेल्या आदेशानुसार या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. ही मुदत संपल्याने निवडणूक प्राधिकरणाने प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

पाच टप्प्यात या निवडणुका घेण्यात येणार आहेत. जिल्हा निवडणूक आराखड्यातील प्रथम टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया २० सप्टेंबरपासून सुधारित निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे सुरू करण्यात येणार आहे. ज्या संस्थांची निवडणूककरिता नामनिर्देशन पत्र प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा संस्था वगळून इतर सर्व सहकारी संस्थांच्या प्रारूप व अंतिम मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२१ या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

-----

३१ डिसेंबर २०२२ अखेर तालुक्यातील विविध प्रकारच्या २०२ संस्थांच्या निवडणुकांची मुदत संपणार आहे. त्यात ‘ब’ वर्गातील १०९,‘क’ वर्गातील ४१ व ‘ड’ वर्गातील ५२ संस्थांचा समावेश आहे. ३१ डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वैजापूर तालुक्यात या कालावधीत मुदत संपणाऱ्या संस्था नाहीत.

-------

दीड वर्षानंतर तालुक्यात असेल रणधुमाळी

डिसेंबर २०२२ अखेर मात्र तालुक्यातील खरेदी विक्री संघ, बाजार समिती, मर्चंट बँकेसह काही पतसंस्थांची निवडणूक मुदत संपणार आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच विविध सेवा सहकारी संस्थांची निवडणूक मुदत संपणार आहे. त्यामुळे आगामी काळात तालुक्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे.

Web Title: Pave the way for co-operative elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.