पावणेदोन लाखांची भिलपुरीत घरफोडी

By Admin | Updated: August 26, 2016 00:39 IST2016-08-26T00:18:54+5:302016-08-26T00:39:19+5:30

जालना : तालुक्यातील भिलपूरी येथील अंबादास बापूराव भुतेकर यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख ७४ हजार २०० रूपयांचा

Pavanodon lacs of Bhilpuri burglary | पावणेदोन लाखांची भिलपुरीत घरफोडी

पावणेदोन लाखांची भिलपुरीत घरफोडी


जालना : तालुक्यातील भिलपूरी येथील अंबादास बापूराव भुतेकर यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख ७४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली. भुतेकर यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुतेकर कुटुंबिय गुरूवारी सकाळी ३ ते ५.३० वाजेच्या सुमारास गाढ झोपेत असताना चोरट्यांनी घराचे कडी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आणि घरातील लोखंडी पेटी आणि कपाट तोडून त्यातील मुद्देमाल चोरून नेला. (प्रतिनिधी)

Web Title: Pavanodon lacs of Bhilpuri burglary