डॉक्टरांंअभावी रुग्णांची हेळसांड

By Admin | Updated: December 10, 2014 00:40 IST2014-12-10T00:38:53+5:302014-12-10T00:40:18+5:30

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील ‘आर्थोपेडिक’ विभागातील वैद्यकीय अधिकारी गत दहा दिवसांपासून रजेवर आहेत़ वैद्यकीय अधिकारी नसल्याने केवळ औषधे खावून रुग्णांना दिवस काढावे लागत आहेत़

Patients suffering from doctor's absence | डॉक्टरांंअभावी रुग्णांची हेळसांड

डॉक्टरांंअभावी रुग्णांची हेळसांड


उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील ‘आर्थोपेडिक’ विभागातील वैद्यकीय अधिकारी गत दहा दिवसांपासून रजेवर आहेत़ वैद्यकीय अधिकारी नसल्याने केवळ औषधे खावून रुग्णांना दिवस काढावे लागत आहेत़ विविध कारणास्तवर झालेल्या हाडांच्या ‘फ्रॅक्चर’वर उपचार करण्यासाठी आलेले रुग्ण आठ ते दहा दिवसांपासून रुग्णालयातच आहेत़
सतत कोणत्या न कोणत्या कारणाने जिल्हा रुग्णालयातील रुग्णांसह नातेवाईकांची होणारी हेळसांड ही कायमच आहे़ एकीकडे कर्मचारीवर्ग रूग्णांचे नातेवाईक आरेरावी करीत असल्याचा आरोप करीत असतानाच रुग्णांसह नातेवाईकांची होणारी हेळसांडही कायम आहे़ त्यात भरीस भर पडली आहे ती आर्थोपेडिक विभागाची़ आर्थोपेडिक विभागात असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा करार संपल्याने ते काम सोडून गेले आहेत़ तर दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचा अपघात झाल्याने ते रजेवर आहेत़ वैद्यकीय अधिकारीच नसल्याने येथे आलेल्या रुग्णांचे हाल मात्र कायम आहेत़ मार्डी (ता़लोहारा) येथील शिवाजी विष्णू पांचाळ हे बैलगाडीवरून पडल्याने हाताच्या हाडाला मार लागला आहे़ त्यामुळे ते उपचारासाठी शुक्रवारी रूग्णालयात दाखल झाले आहेत़ मात्र, केवळ गोळ्या खाऊन ते आजही उपचार घेत आहेत़ दुचाकी अपघातात जखमी झालेल्या वाशी येथील सुभाष भिमराव पिंगळे यांचीही कहाणी अशीच! तर बिहार राज्यातील गोपाल शर्मा हा जखमी इसमही अद्याप रुग्णालयातच पडून आहे़
तडवळा येथील सत्यभामा निकाळजे ही महिल सात दिवसांपासून रूग्णालयातच आहे़ अपघातात पायाला गंभीर जखम झालेल्या प्रमोद भैरट (रा़विजोरा ता़वाशी) या जखमी युवकालाही डॉक्टरांची प्रतिक्षा करीतच दिवस काढावे लागत आहेत़ सद्यस्थितीत या विभागात २७ रूग्ण दाखल आहेत़ कोणी अपघातात तर कोणी इतर कारणाने हाडाला दुखापत झाली म्हणून उपचारासाठी आले आहेत़ मात्र, वैद्यकीय अधिकारीच नसल्याने नेमकी परिस्थिती काय ? याचे उत्तर रुग्णांनाच नव्हे तर नातेवाईकांनाही मिळत नाही़ केवळ गोळ्या-औषध आणि सलाईनवर दिवस काढण्याची वेळ या रूग्णांवर आली आहे़ (प्रतिनिधी)
आता होईल ते होईल
४पाच-सहा दिवस झाले वडिल मारूती सुतार (वय-६५ राख़ानापूर) यांना उपचारासाठी येथे दाखल केले आहे़ मात्र, डॉक्टर अद्यापही आलेले नाहीत़ कर्मचारी देतात त्या गोळ्या खाऊन दिवस काढले़ डॉक्टर येतील की नाही ? याचे उत्तर कोणाकडेच मिळत नाही़ मोलमजुरी करून आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, आता होईल ते होईल म्हणून आम्ही घराकडे जात असल्याचे पोपट सुतार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़
डॉक्टरांना बोलाविले आहे
४आर्थोपेडिक विभागातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा करार संपल्याने ते काम सोडून गेले आहेत़ नातेवाईकांंच्या अपघातामुळे दुसरे वैद्यकीय अधिकारी रजेवर आहेत़ उस्मानाबाद येथेच नियुक्ती असलेले मात्र, सोलापुरात ‘डेप्युटेशन’वर असलेले डॉ़ गणेश पाटील यांना बोलाविण्यात आले आहे़ ते आज (मंगळवारी) सायंकाळपर्यंत येतील, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ जयपाल चव्हाण यांनी सांगितले़

Web Title: Patients suffering from doctor's absence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.