पडेगावात रुग्णाचे घर फोडले ; शेजाऱ्याची मोटारसायकल पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:02 AM2021-01-19T04:02:01+5:302021-01-19T04:02:01+5:30

येथील रहिवासी शांतीलाल जयवंतराव निकम हे शेती करतात. शहरातील खासगी रुग्णालयात निकम यांच्या पत्नीला उपचारांसाठी १६ जानेवारी रोजी ...

The patient's house was broken into in Padegaon; Neighbor's motorcycle hijacked | पडेगावात रुग्णाचे घर फोडले ; शेजाऱ्याची मोटारसायकल पळविली

पडेगावात रुग्णाचे घर फोडले ; शेजाऱ्याची मोटारसायकल पळविली

googlenewsNext

येथील रहिवासी शांतीलाल जयवंतराव निकम हे शेती करतात. शहरातील खासगी रुग्णालयात निकम यांच्या पत्नीला उपचारांसाठी १६ जानेवारी रोजी दाखल केले होते. यामुळे निकमदेखील त्यांच्यासोबत रुग्णालयात रात्री मुक्कामी होते. ही संधी साधून दाराचे कुलूप तोडून चोरटे घरात शिरले. घरातील पेटीतून रोख ५५ हजार रुपये आणि सुमारे सव्वालाखाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी निकम हे घरी गेले असता कडीकोंडा तुटलेला दिसला. त्यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून गुन्हा नोंदविला.

========

शेजाऱ्याची मोटारसायकल नेली

निकम यांचे शेजारी बाबासाहेब तुकाराम ढेपे यांची घरासमोर उभी केलेली मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केल्याचे रविवारी सकाळी त्यांना समजले. ढेपे यांनी छावणी ठाण्यात तक्रार नोंदविली.

Web Title: The patient's house was broken into in Padegaon; Neighbor's motorcycle hijacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.