शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रूग्ण थेट झोळीतून अधीक्षक कार्यालयात

By admin | Updated: July 31, 2016 01:14 IST

बीड : तालुक्यातील पिंपळवाडी येथे दोन गटातील मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचा पोलीस जवाब घेत नाही, असा आरोप करून नातेवाईकांनी शनिवारी झोळीत टाकून

बीड : तालुक्यातील पिंपळवाडी येथे दोन गटातील मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचा पोलीस जवाब घेत नाही, असा आरोप करून नातेवाईकांनी शनिवारी झोळीत टाकून त्याला थेट अधीक्षक कार्यालयात नेले. या प्रकरणी नेकनूर ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाला आहे.पिंपळवाडी येथील तानाजी काळे याचे गावात सलूनचे दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ९ ते १० जणांनी त्याला बेदम मारहाण केली. यात तो जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी १२ वाजता नेकनूर पोलीस जवाब घेत नाहीत, तक्रार न नोंदविण्यासाठी दबाव आणतात, असा आरोप करून नातेवाईकांनी त्याला जिल्हा रूग्णालयातून झोळीत टाकत लगतच असलेल्या अधीक्षक कार्यालयात आणले. अधीक्षक अनिल पारसकर यावेळी कार्यालयात नव्हते. कर्मचाऱ्यांनी वायरलेसवरून नेकनूर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर त्याचा जवाब नोंदविण्यात आला.दरम्यान, दुसऱ्या गटाचे दत्ता महादेव साळवे यांचीही पोलिसांनी फिर्याद घेतली असून, तानाजी काळेसह चौघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद केला आहे. तानाजी काळे याच्या फिर्यादीवरून दत्ता साळवेसह इतरांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.याबाबत सहायक निरीक्षक प्रवीण चव्हाण म्हणाले, दोन गटात हाणामाऱ्या झाल्याने दोन्ही फिर्यादी नोंदविल्या आहेत. तानाजी काळे यांच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. (प्रतिनिधी)