जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग झाला मोकळा
By Admin | Updated: April 9, 2015 00:11 IST2015-04-08T23:53:05+5:302015-04-09T00:11:21+5:30
जालना : जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील महाराष्ट्र विकास श्रेणीचा अडथळा दूर झाला आहे.

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग झाला मोकळा
जालना : जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील महाराष्ट्र विकास श्रेणीचा अडथळा दूर झाला आहे.
राज्य शासनाने याबाबत आठवडाभरापूर्वीच निर्णय घेऊन बीड जिल्ह्यात दोन कर्मचाऱ्यांना तातडीने बढतीही दिली असल्याची माहिती रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन व जि.प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आली.
आरोग्य पर्यवेक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना या आदेशामुळे आता सहाय्यक गटविकास अधिकारी वर्ग-२ या पदावर पदोन्नती मिळणार आहे. औरंगाबाद विभागातील जिल्हा तांत्रिक सेवा व जिल्हा सेवा वर्ग - ३ मधील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र विकास श्रेणी गट - ब मध्ये नियुक्ती करण्यात आल्याने संपूर्ण राज्यात याचा लाभ सर्व पात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळेल, असा विश्वास या दोन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त करण्यात आला. (प्रतिनिधी)
आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित होती. संघटनेचे राज्याध्यक्ष महेश जाधव, शिवाजी गवई, सतीश कांबळे, अण्णासाहेब सपकाळे यांच्यासह आपण व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे विभागीय सरचिटणीस सुदेश वाठोरे व सहकाऱ्यांच्या प्रयत्नास यश मिळाले.
-पुरूषोत्तम वैष्णव ,राज्य कोषाध्यक्ष, जि.प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटना
अध्यादेशाची अंमलबजावणी औरंगाबाद विभागात झाल्यामुळे राज्यातील इतरही भागात या पदोन्नतीबाबतचा निर्णय होण्याच्या हालचाली राज्य शासनाकडून सुरू आहेत. आरोग्य विभागातील क्षमता असणारे कर्मचारी फक्त विस्तार अधिकारी या पदापर्यंतच बढती मिळवू शकत होते. त्यांना ही श्रेणी लागू झाल्याने वरिष्ठ पदापर्यंत मिळण्याची संधी मिळाली आहे.
- सुदेश वाठोरे, मराठवाडा विभाग सरचिटणीस,
रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन