तपाेवन एक्स्प्रेसमध्ये हाॅकर्सकडून प्रवाशाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:02 IST2021-07-11T04:02:56+5:302021-07-11T04:02:56+5:30

औरंगाबाद : तपोवन एक्स्प्रेसमध्ये महिलांना पाहून अपशब्द उच्चारण्याचा जाब विचारणाऱ्या एका प्रवाशाला ७ ते ८ हाॅकर्सकडून मारहाण ...

Passengers beaten by hackers on Tapavan Express | तपाेवन एक्स्प्रेसमध्ये हाॅकर्सकडून प्रवाशाला मारहाण

तपाेवन एक्स्प्रेसमध्ये हाॅकर्सकडून प्रवाशाला मारहाण

औरंगाबाद : तपोवन एक्स्प्रेसमध्ये महिलांना पाहून अपशब्द उच्चारण्याचा जाब विचारणाऱ्या एका प्रवाशाला ७ ते ८ हाॅकर्सकडून मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी परतूर रेल्वे स्थानकावर घडली. या प्रकरणी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संजय वाघमारे यांनी फिर्याद नोंदविली आहे. परतूर रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी तपोवन एक्स्प्रेसमध्ये काही हाॅकर्स महिलांना पाहून शेरेबाजी करीत होते. संजय वाघमारे यांनी त्यांना असे करू नका म्हटले. तेव्हा आमचे गाव येत आहे, तुम्हाला बघून घेतो, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर परतूर रेल्वे स्टेशन येताच ७ ते ८ हाॅकर्सनी संजय वाघमारे यांना मारहाण केली. रेल्वे सुरू झाल्यानंतर सर्व हाॅकर्स पळून गेले. हा प्रकार काहींनी मोबाइलमध्ये चित्रित केला. समाज माध्यमावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी संजय वाघमारे यांनी नांदेड येथे फिर्याद नोंदविली. पोलीस हवलदार गडलिंगे यांनी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरवले हे करीत आहेत. यात एका हाॅकरची ओळख पटली असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.

Web Title: Passengers beaten by hackers on Tapavan Express