शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

घाटी रुग्णालयात आता दाखल रुग्णांना भेटण्यासाठी पास बंधनकारकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 19:42 IST

चोवीस तासांसाठी लाल, तर भेटायला येणाऱ्यांसाठी निळ्या रंगाचा पास

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात रुग्णांसोबत थांबणारे नातेवाइक, भेटायला जाणाऱ्यांसाठी आता पास योजनेची अंमलबजावणी होणार आहे. यात रुग्णांना २४ तास भेटण्यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे पासचे वाटप करण्यात येणार असून, आजपासूनच ही पास प्रणाली सुरू होणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी घाटी रुग्णालयातच उपचार घ्यायला गेलेल्या तरुणाला मारण्यासाठी पन्नासपेक्षा अधिक टवाळखोरांच्या गटाने प्रवेश केला होता. वारंवार रुग्णाचे नातेवाईक व डॉक्टरांमध्ये वादाचे प्रसंग घडतात. शिवाय, रुग्णाला भेटायला एकाच वेळी १० ते १५ नातेवाईक आल्याने उपचारांमध्येदेखील अडथळा निर्माण होतात. या सर्व बाबी लक्षात घेता शुक्रवारी घाटीत दुपारी सुक्रे यांनी सुरक्षा समितीची बैठक घेत पास प्रणालीवर चर्चा केली. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शोएब यांच्याकडे पास वितरण व संकलन जबाबदारी देण्यात आली.

अशी असेल प्रणाली- रुग्णाला २४ तास भेटण्यासाठी दोन प्रकारचे पास देण्यात येतील.- त्यामध्ये रुग्णासोबत थांबणाऱ्या नातेवाइकांना लाल रंगाचे दोन पासेस देण्यात येतील. तर भेटायला येणाऱ्या नातेवाइकासाठी एक निळ्या रंगाचा पास मिळेल.- रुग्ण गंभीर असेल तर अतिरिक्त लाल रंगाचे दोन पास देण्यात येतील. पास नसेल तर कोणालाही आता घाटी रुग्णालयात प्रवेश मिळणार नाही.- रात्री ११ वाजेपर्यंत नातेवाइकांना प्रवेश मिळेल. भविष्यात ही वेळ नऊ वाजेपर्यंत आणली जाईल.- अपघात, एखाद्या मोठ्या घटनेत रुग्णासोबत दोनपेक्षा अधिक नातेवाईक, मित्र येतात. अशा अपवादात्मक परिस्थितीत निश्चित काही वेळेसाठी नातेवाइकांना आत सोडण्यात येईल.

त्रास होईल, पण रुग्णाच्या फायद्यासाठीचपास प्रणाली अनेकांना अडचणीचे वाटेल. मात्र, रुग्णाच्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयातील आतील भाग स्वच्छ राहावा, रुग्णाला संसर्ग होऊ नये, हा उद्देश आहे. रुग्ण, नातेवाइकांनी सहकार्य करावे.- डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी