परसोडा-शिवराई रस्त्याच्या कामाला अखेर सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:04 IST2021-04-06T04:04:12+5:302021-04-06T04:04:12+5:30

परसोडा : गेल्यावर्षी मुख्यमंत्री ग्रामसडक निधीतून परसोडा ते शिवराई रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु, या रस्त्याच्या कामात शिवराईजवळ अर्धा ...

Parsoda-Shivrai road work finally started | परसोडा-शिवराई रस्त्याच्या कामाला अखेर सुरूवात

परसोडा-शिवराई रस्त्याच्या कामाला अखेर सुरूवात

परसोडा : गेल्यावर्षी मुख्यमंत्री ग्रामसडक निधीतून परसोडा ते शिवराई रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु, या रस्त्याच्या कामात शिवराईजवळ अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम एका शेतकऱ्याने बंद पाडले. प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांनी त्या शेतकऱ्याची समजूत काढल्यानंतर अखेर या रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे.

वर्षभरापासून बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एस. पवार, कनिष्ठ अभियंता किशोर भुजंग, व्ही. बी. शेळके, परसोडाचे सरपंच साहेबराव बारसे, उपसरपंच राजू छानवाल, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुदामसिंग छानवाल, माजी सरपंच रामभाऊ कवडे, नारायण कवडे, धोंदलगावचे सरपंच कैलास आवारे, संजारपूरवाडीचे सरपंच राजूसिंग जारवाल, बाळू शिंदे, भगवान महेर, गणेश डिके, जमादार शेख यांच्या मध्यस्थीने रस्ता कामात अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्याची समजूत काढण्यात आली. या सर्वांच्या मध्यस्थीने अखेर रखड़लेल्या रस्ता कामाला सुरूवात झाली आहे.

Web Title: Parsoda-Shivrai road work finally started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.