शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

परळीत कोळशाची टंचाई कायम

By admin | Updated: December 3, 2014 00:41 IST

परळी: परळी औष्णिक विद्युत केंद्राला कोळशाची टंचाई भासू लागली आहे. नवीन व जुन्या औष्णिक केंद्रात सध्या २० हजार टन कोळसा शिल्लक आहे

परळी: परळी औष्णिक विद्युत केंद्राला कोळशाची टंचाई भासू लागली आहे. नवीन व जुन्या औष्णिक केंद्रात सध्या २० हजार टन कोळसा शिल्लक आहे. विजनिर्मितीसाठी एका संचाला दररोज अंदाजे ४ हजार टन कोळसा लागतो. सध्या एकुण पाच संचापैकी तीन संचच चालु आहेत. या तीन संचाला दोना दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. कोळशाच्या टंचाईमुळे संच क्र.४ हा दिवाळीपासून बंद असल्याने या संचातून वीज निर्मिती ठप्प झाली आहे तर संच क्र. ३ हा गेल्या दीड वर्षापासून पाण्याच्या समस्येमुळे बंद ठेवलेला असून अद्याप सुरु केलेला नाही. परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात सध्या दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. जेवढा कोळसा आवश्यक आहे तेवढाचा कोळया येत असल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे. जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील सध्या एकच संच चालु असून या ठिकाणी ४ हजार ८०० टन कोळसा शिल्लक आहे तर नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील दोन संच चालु आहे. या ठिकाणी १६ हजार टन कोळसा उपलब्ध आहे. दररोज एका संचासाठी ४ हजार टन कोळशाची गरज भासते. या संदर्भात परळी औष्णिक केंद्राचे अधिक्षक अभियंता मनोहर खांडेकर म्हणाले, दोन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा शिल्लक आहे.आज दोन रेल्वे रॅक कोळया येण्याची शक्यता आहे तर विजनिर्मितीसाठी डिसेंबर महिन्यापर्यंत पुरेल एवढाचा पाणीसाठा आहे. दरम्यान, एकुण पाच संचापैकी नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र. ६, ७ व जुन्या औष्णिक केंद्रातील संच क्र.५ असे एकुण तीन संच चालू आहेत. या तीन संचातून मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ५६७ मेगाव्हॅट विजेचे उत्पादन सुरु होते. (वार्ताहर)गतवर्षी पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्र बंद ठेवावे लागले होते. याचा मोठा फटका वीज निर्मितीवर झाला होता. या वर्षी पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरूवात झाली आहे. एका बाजूला कोळसा अल्प प्रमाणात उपलब्ध होत आहे. तर दुसऱ्या बाजूला पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यामुळे वीज उत्पादनावर या सर्व बाबींचा परिणाम होण्याची शक्यता आहे.