मुलांच्या विकासासाठी आज पालकांसाठी व्याख्यान
By Admin | Updated: June 26, 2014 00:58 IST2014-06-26T00:43:16+5:302014-06-26T00:58:12+5:30
औरंगाबाद : शाळा सुरू झाल्या असून, मुलांच्या अभ्यासाची काळजी सगळ्याच पालकांना असते. या पार्श्वभूमीवर मुलांचा अभ्यास कसा करून घ्यावा यासंदर्भात पालकांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

मुलांच्या विकासासाठी आज पालकांसाठी व्याख्यान
औरंगाबाद : शाळा सुरू झाल्या असून, मुलांच्या अभ्यासाची काळजी सगळ्याच पालकांना असते. या पार्श्वभूमीवर मुलांचा अभ्यास कसा करून घ्यावा यासंदर्भात पालकांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
लोकमत सखी मंचतर्फे ‘उमलती मुले सुगंधित फुले’ या कार्यक्रमात पुणे विद्यापीठाच्या सुवर्णपदक विजेत्या व गाजलेल्या समुपदेशक अंजली तापडिया यांचे व्याख्यान पालकांसाठी आयोजित करण्यात आले आहे. लोकमत हॉलमध्ये (लोकमत भवन, जालना रोड) २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या व्याख्यानाचा लाभ पालकांनी घ्यावा, असे आवाहन सखी मंचने केले आहे.
‘बाल मनोविज्ञान आणि पालक -बालक संबंध’ या विषयावर आधारित स्लाईड शोसह अंजली तापडिया सविस्तर व्याख्यान देतील. प्रत्येक आई- बाबाने ऐकावे असे हे व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे. प्रवेश मागील गेटने करावा.
व्याख्यानाचा लाभ पालकांनी घ्यावा, असे आवाहन सखी मंचतर्फे करण्यात आले आहे. यावेळी सखी मंचच्या मेंबरशिपच्या वेळेस जाहीर केलेले लक्की ड्रॉ काढण्यात येतील. लकी ड्रॉ विजेत्यांना सोफा, रिस्ट वॉचेस, क्रॉकरी, पर्स, मोत्याचे सेट, वॉटर प्युरिफायर, मायक्रोवेव्ह आणि गिफ्ट व्हाऊचर मिळेल.