परभणीत पत्रकारांचे आंदोलन
By Admin | Updated: April 25, 2016 23:32 IST2016-04-25T23:27:09+5:302016-04-25T23:32:14+5:30
परभणी : पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा, पत्रकारांना पेन्शन लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाभरातील पत्रकारांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

परभणीत पत्रकारांचे आंदोलन
परभणी : पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा, पत्रकारांना पेन्शन लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाभरातील पत्रकारांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्यानंतर माहिती अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात २५ एप्रिल रोजी जिल्हा माहिती कार्यालयासमोर निदर्शने करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी ११ वाजता पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात बहुभाषिक पत्रकार संघ व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार डॉ.धनाजी चव्हाण, प्रवीण देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी करंदीकर यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील पत्रकार बहुसंख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने पत्रकार दिलीप माने, संतोष धारासूरकर, दत्ता लाड यांच्या नेतृत्वाखाली मागण्यांचे निवेदन जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आले.
पत्रकारांचे विविध प्रश्न माहिती अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करण्यात आले.
पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)