परभणीचा पारा ४० अंशावर
By Admin | Updated: March 18, 2016 00:06 IST2016-03-17T23:54:53+5:302016-03-18T00:06:26+5:30
परभणी : जिल्ह्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली असून गुरुवारी जिल्ह्याचे तापमान ४० अंशावर पोहचल्याने दिवसभर अंगाची काहिली झाली.

परभणीचा पारा ४० अंशावर
परभणी : जिल्ह्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली असून गुरुवारी जिल्ह्याचे तापमान ४० अंशावर पोहचल्याने दिवसभर अंगाची काहिली झाली.
परभणी जिल्ह्यात दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा पारा वाढतो. यावर्षी मात्र मार्च महिन्यापासूनच कडक ऊन पडू लागले आहे. गुरुवारी सकाळी १२ वाजेपासूनच उन्हाचा पारा वाढला होता. दिवसभर कडक ऊन पडले होते. वाढत्या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले. दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवरही वाहतूक विरळ झाल्याचे दिसून आले. सायंकाळच्या सुमारास उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी वातावरणातील उकाडा मात्र कायम होता. दरम्यान, ऊन वाढल्याने नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी कुलर्स सुरु केली आहेत. घरोघरी कुलर्स बसवून उकाड्यापासून दिलासा मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.