परभणी कडकडीत बंद

By Admin | Updated: June 5, 2014 00:10 IST2014-06-04T23:50:31+5:302014-06-05T00:10:48+5:30

परभणी : केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिवसेनेने केलेल्या आवाहनानुसार बुधवारी परभणी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.

Parbhani clot them off | परभणी कडकडीत बंद

परभणी कडकडीत बंद

परभणी : केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिवसेनेने केलेल्या आवाहनानुसार बुधवारी परभणी शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे दिल्ली येथे अपघाती निधन झाल्याची वार्ता समजल्यानंतर जिल्हाभरात अनेकांनी शोकभावना व्यक्त केल्या. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे मराठवाड्याचा, बहुजनांचा, कष्टकरी, शेतकर्‍यांचा नेता हरवल्याची भावना व्यक्त होत होती. जिल्ह्यामध्ये परभणी वगळता अन्य ठिकाणी मंगळवारीच व्यापार्‍यांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली होती. परभणी शहरातही मंगळवारी भाजपाच्या वतीने शिवाजी चौकामध्ये शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ४ जून रोजी परभणी बंदचे आवाहन शिवसेनेने केले होते. त्यानुसार आज सकाळपासूनच बाजारपेठेतील दुकाने बंद राहिली. गांधी पार्क, गुजरी बाजार, कच्छी बाजार, नानलपेठ कॉर्नर, शिवाजी चौक, स्टेडियम कॉम्प्लेक्स, स्टेशनरोड आदी भागातील दुकाने कडकडीत बंद राहिली. एरव्ही बाजारपेठेत असलेली गजबज आज पहावयास मिळाली नाही. सर्व रस्ते सुनसान दिसत होते. सायंकाळी उशिरापर्यंत बाजारपेठ शांत होती. शिवसेनेच्या आवाहनाला व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात शोकसभा घेण्यात आली. यावेळी अनेकांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने महाराष्ट्राचे व मराठवाड्याचे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. हा कार्यक्रम खा.संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप भंडारी, उपजिल्हाप्रमुख प्रा.डॉ.पंढरीनाथ धोंडगे, माणिक पोंढे, तालुकाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, शहरप्रमुख रामप्रसाद रणेर, शहर संघटक ज्ञानेश्वर पवार, मनपाचे गटनेते अतुल सरोदे, शशिकांत खन्ना, प्रवीण गोमचाळे, सचिन पाटील, सदाशीव देशमुख, अनिल डहाळे, नगरसेवक नवनीत पाचपोर, विजय गायकवाड, शेख शब्बीर, व्यंकटेश मुरकुटे, धनंजय पाटील, दिलीप कुटे, बंटी जाधव, अंकुश शेटे, अजित दुधाटे, शिवराज राऊत, किशोर रणेर, स्वप्निल काळे, सुदाम माने आदी. यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Parbhani clot them off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.