शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम बांधवांचा परभणीत मोर्चा

By admin | Updated: December 18, 2015 23:31 IST

परभणी :शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

परभणी : हिंदू महासभेचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांनी मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन त्यांना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हिंदू महासभेचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांनी मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ १८ डिसेंबर रोजी परभणीत मोर्चा काढण्यात आला. दुपारी २ वाजता शहरातील अपना कॉर्नर भागातून मोर्चाला सुरुवात झाली.सदर मोर्चा ग्रॅन्ड कॉर्नर, जिल्हा क्रीडा संकुलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला. येथे विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यामध्ये कमलेश तिवारी यांच्या वक्तव्याने मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कायदेशीर खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. मुफ्ती निजामोद्दीन, मौलाना रफियोद्दीन अशरफी, मौलाना सरफराज, सय्यद अब्दुल खादर, महमद अल्ताफ मेमन, जाकीर कुरेशी, अली खान, मुज्जमील खान, अ‍ॅड. शोएब, अ‍ॅड. जावेद कादर, काजी उबेद शालीमार, प्रो. वसीम, हफीज चाऊस, माजू लाला, रशीद इंजिनिअर, शेख मुज्जमील, विजय वाकोेडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, मोर्चानंतर शांततेच्या मार्गाने मोर्चेकरी परतले. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधीक्षक नियती ठाकर स्वत: दुपारी १ वाजेपासून बंदोबस्तासाठी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)