शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

'पपा मला वाचवा'; रिक्षाचालकाकडून मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, रस्त्यात वडील दिसल्याने सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 17:52 IST

मुलीच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला; जीवावर बेतलेल्या प्रसंगातून झाली सुटका

- शेख मेहमूद

वाळूज महानगर : रिक्षातून घरी परतणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा रिक्षाचालकाद्वारे अपहरण करण्याचा प्रयत्न बुधवारी मुलीच्या प्रसंगावधानानेच फसला. विद्यार्थिनीने आरडाओरडा केल्याने नागरिक मदतीसाठी धावून आले, पुढील अनर्थ टळला. नंतर संतप्त जमावाने रिक्षाचालकास चोप दिल्यानंतर तो पसार झाला.

तृप्ती (१७, नाव बदलले आहे) ही कुटुंबासह रांजणगावात वास्तव्यास असून बजाजनगरातील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. दररोज तृप्ती रिक्षातून क्लासला ये-जा करते. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास क्लास संपल्यानंतर तृप्ती घरी जाण्यासाठी उद्योगनगरीतील स्टरलाइट कंपनीसमोरून रिक्षाची वाट पाहत उभी होती. यावेळी पंढरपूरकडून रांजणगावकडे जाणाऱ्या रिक्षा (क्रमांक एम.एच.२०, ई.एफ.५५४१)च्या चालकाने रिक्षा थांबविली. या रिक्षात एकही प्रवासी नव्हता. तृप्तीने मला रांजणगावात जायचे असल्याचे सांगितल्यानंतर रिक्षाचालकाने तिला रिक्षात बसवले. रांजणगावच्या दिशेने निघाला होता.

दरम्यान, रांजणगाव फाट्यावर आल्यानंतर रिक्षाचालकाने गावात रिक्षा वळविण्याऐवजी सुसाट वेगाने रिक्षा घेऊन सीएट रोडने निघाला. रस्त्यात तृप्तीने रिक्षाचालकास सतत विनवण्या केल्या. मात्र तिच्या बोलण्याकडे रिक्षाचालकाने दुर्लक्ष केले. रिक्षा अधिक वेगाने पुढे नेऊ लागला. रिक्षाच्या दरवाजाजवळ दोन्ही बाजूने पुठ्याचे कव्हर लावलेले असल्याने तसेच रिक्षा वेगात असल्याने तृप्तीला रिक्षातून उडी मारता आली नाही.

आरडाओरडा केल्याने अनर्थ टळलावडिलांच्या वयाचा असलेला रिक्षाचालक सुसाट वेगाने रिक्षा पळवित होता. अपहरण व छेडछाडीच्या भीतीमुळे घाबरलेल्या तृप्तीने रिक्षाचालकास रिक्षा थांबविण्यासाठी गयावया सुरू केली. अशातच ही रिक्षा ऋचा इंजिनिअरिंग कंपनीजवळ सुसाट वेगाने जात असताना तृप्ती हीस तिचे वडील दिसले. तिने जिवाच्या आकांताने पप्पा.. पप्पा हाक मारून ओरडल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारक व तृप्तीच्या वडिलांनी रिक्षाचा पाठलाग केला. काही अंतर पाठलाग केल्यानंतर तृप्तीच्या वडिलांनी रिक्षासमोर दुचाकी आडवी लावली. रिक्षा थांबली. यानंतर संतप्त जमावाने रिक्षाचालकास बेदम चोप दिला. घटनेनंतर तृप्तीस वडिलांनी धीर दिला. चौकशी केली असता तिने आपबिती सांगितली.

रिक्षा चालक पोलीस ठाण्यात आला या घटनेनंतर रिक्षाचालक संधी साधून घटनास्थळी रिक्षा सोडून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच ११२ हेल्पलाइनच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तृप्ती हिची विचारपूस केली. मारहाणीत जखमी झालेला रिक्षाचालक जमावाच्या तावडीतून निसटत पोलिस ठाण्यात हजर झाला. या रिक्षाचालकाच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरू असल्याने पोलिसांनी त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस