पनवेलचे प्रेमी युगूल पकडले
By Admin | Updated: August 17, 2015 01:02 IST2015-08-17T00:43:37+5:302015-08-17T01:02:44+5:30
पारध : पनवेल तालुक्यातील छोटा खांदा येथून पळून आलेल्या प्रेमी युगुलास पारध पोलिसांनी हिसोडा रस्त्यावर पकडले. छोटा खांदा (ता.पनवेल जि. रायगड) येथील १८ वर्षीय

पनवेलचे प्रेमी युगूल पकडले
पारध : पनवेल तालुक्यातील छोटा खांदा येथून पळून आलेल्या प्रेमी युगुलास पारध पोलिसांनी हिसोडा रस्त्यावर पकडले.
छोटा खांदा (ता.पनवेल जि. रायगड) येथील १८ वर्षीय तरूणी पनेवलला जाऊन येते म्हणून घरातून बाहेर पडली होती. ती घरी आलीच नसल्याने नातेवाईकांनी ११ आॅगस्ट रोजी कामोठे नवी मुंबई पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान त्याच दिवशी विक्रम सुरडकर हा तरूण हरवल्याची तक्रार १२ आॅगस्ट रोजी त्याच ठाण्यात करण्यात आली होती.विक्रम हा मूळचा जालना जिल्ह्यातील शेलुद येथील असल्याने मुलीच्या नातेवाईकांनी १५ आॅगस्ट रोजी शेलूद गाठले. तेथे चौकशी केली असता मुलगी व विक्रम तेथे मिळून आले. नातेवाईक आल्याची माहिती मिळाल्याने मध्यरात्रीनंतर १ वाजेच्या सुमारास त्यांनी गाव सोडले. दोघेही पायी हिसोड्याकडे गेले. दरम्यान ही माहिती मुलीच्या नातेवाईकांनी पारध पोलिसांना दिली. तेव्हा पोलिसांनी हिसोडा रस्त्यावर त्या दोघांनाही पकडले. (वार्ताहर)