नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे प्रगतीपथावर
By Admin | Updated: September 26, 2016 00:07 IST2016-09-25T23:44:44+5:302016-09-26T00:07:26+5:30
लातूर : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्प तुडूंब भरले असून, नदी-नाल्यांनाही पूर आला आहे. या पुरामध्ये वाहून गेलेल्या पिकांच्या पंचनाम्यांचे

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे प्रगतीपथावर
लातूर : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्प तुडूंब भरले असून, नदी-नाल्यांनाही पूर आला आहे. या पुरामध्ये वाहून गेलेल्या पिकांच्या पंचनाम्यांचे काम विमा कंपनी, कृषी विभागाचा प्रतिनिधी व ग्रामसेवक यांच्या स्थानिक समितीमार्फत सुरू करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी ९२२ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पही तुडूंब भरले असून, नदीकाठच्या गावांतील पिके पाण्याखाली आली आहेत. या नदीकाठच्या गावांतील पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनासह स्थानिक स्तरावरील समितीमार्फत तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश दिले असल्याने पंचनाम्याच्या कामांना गती आली आहे. दरम्यान, आठवडाभरात झालेल्या पावसामुळे उर्वरित पिकेही पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पिके वाळली आहेत. काही ठिकाणी पाण्याखाली आली आहेत. तर गावांतील पिकांना मोड आल्याने सोयाबीन, तूर व इतर खरीपातील पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याचे आदेश देऊनही महसूल प्रशासनाचा कर्मचारी, कृषी विभागाचा कर्मचारी व विमा कंपनीचा प्रतिनिधी यांची स्थानिक समिती निर्माण केली आहे. या समितीने तात्काळ नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, असे आदेश देऊनही कृषी विभागाचे पंचनाम्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पंचनाम्यांच्या कामाकडे विमा कंपनीकडूनही दुर्लक्ष होत आहे.
पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विमा कंपनी, कृषी व तहसील प्रशासनाला दिले आहेत. परंतु, कृषी विभागाने मात्र या पंचनाम्यातून विभक्त होऊन सदरील पंचनाम्याच्या जबाबदारी विमा कंपनीकडे दिली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक प्रतापसिंंह कदम यांनी सांगून पंचनाम्याच्या कामातून पळवाट काढली आहे. तर इफको टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनीकडून मात्र नदीला पूर आल्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले असल्याचे सांगून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची माहिती विमा कंपनीचे अधिकारी मोदाणी यांनी दिली.
पूर्वी नुकसानग्रस्त भागांतील पिकांचे पंचनामे तात्काळ केले जायचे. परंतु, यावर्षी मात्र पंचनाम्याची पद्धत प्रशासनाने बदलली आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीची लेखी तक्रार केल्यावर संबंधित तहसीलदारांकडून कृषी विभागाला सूचना दिल्या जात आहेत. त्यानंतर महसूल व कृषी विभाग, विमा कंपनीकडून पंचनामे केले जात आहेत.