शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीच्या खड्ड्याचा बळी! तान्ह्या मुलासह ३ मुलींच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 12:26 IST

रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या खड्ड्यात इतर एका वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे त्यांची दुचाकी पडली.

- सचिन लहानेऔरंगाबाद : तीन मुलींच्या पाठीवर १५ दिवसांपूर्वी मुलगा झाला. घरात सर्वत्र आनंदी आनंद असतानाच वडिलांचा नक्षत्रवाडी परिसरातील रस्त्याच्या कडेला खोदलेल्या समांतर वाहिनीच्या खड्ड्यांनी जीव घेतल्याची घटना बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आल्याची माहिती निरीक्षक देविदास गात यांनी दिली.

शेख मोबीन शेख इसाक (३२, रा. बिडकीन) असे मृताचे नाव आहे. मोबीन हे ट्रकवर चालक म्हणून काम करतात. बुधवारी रात्री ते औरंगाबादेत काम संपवून दुचाकीवर बिडकीनच्या दिशेने निघाले होते. नक्षत्रवाडी परिसरात गेल्यानंतर रस्त्याच्या बाजूने खोदलेल्या खड्ड्यात इतर एका वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे त्यांची दुचाकी पडली. हा खड्डा तब्बल २० फुटांपेक्षा अधिक खोल आहे. नागरिकांनी त्यांना बाहेर काढून घाटी रुग्णालयात नेले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मोबीन शेख यांना तीन मुलींच्या पाठीवर १५ दिवसांपूर्वी मुलगा झाला. या आनंदावर या घटनेमुळे विरजण पडले आहे.

पैठण रोड की मृत्यूचा सापळा?औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या कडेला मागील अनेक महिन्यांपासून शहरातील समांतर जलवाहिनीचे काम सुरू आहे. जलवाहिनीचे पाइप टाकण्यासाठी २० ते २२ फूट खोल चारी खोदण्यात आली आहे. अगदी रस्त्याला खेटून असल्यामुळे त्यासाठी बॅरिकेटस् वगैरे काहीही लावलेले नाही. रात्रीच्या अंधारात या खड्ड्यात कोणतेही वाहन आत जाऊ शकते. शेख मोबीन यांची दुचाकीसुद्धा अशाच पद्धतीने खड्ड्यात कोसळली. त्यामुळे पैठण रस्ता हा वाहनचालकांच्या मृत्यूचा सापळाच बनल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू