पैठण नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी चुरस

By Admin | Updated: July 9, 2014 00:52 IST2014-07-09T00:25:33+5:302014-07-09T00:52:17+5:30

पैठण : पैठण नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दि. १७ रोजी नगर परिषद सदस्यांची विशेष सभापी उपजिल्हाधिकारी रवींद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे.

Paithan, Chief of the Town, elections for the post of Deputy Chief Minister | पैठण नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी चुरस

पैठण नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी चुरस

पैठण : पैठण नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दि. १७ रोजी नगर परिषद सदस्यांची विशेष सभा न. प.च्या सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रवींद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे.
दुपारी ३ वा. घेण्यात येणाऱ्या विशेष सभेत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवड करण्यात येणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दि. ९ ते १० च्या दुपारी ३ वाजेपर्यंत मुख्याधिकारी नगर परिषद यांच्याकडे दाखल करण्याची मुदत आहे. दि. १० रोजी दुपारी ३ वाजेनंतर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून दि. १५ रोजी वैध उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात येणार आहे.
दि. १६ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दि. १७ रोजी विशेष सभेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार आहे.
नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुले
पैठणचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुले असल्याने या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाचे बहुमत असलेल्या या नगर परिषदेत नगराध्यक्षपद कायम राखण्यासाठी काँग्रेस सज्ज असून यंदा शिवसेनाही नगराध्यक्ष पदासाठी सरसावली असल्याने या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
अंतिम बाजी कोण मारणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
पक्षीय बलाबल
पैठण नगर परिषदेत सदस्यांची संख्या २० एवढी आहे. यात काँग्रेस १०, राष्ट्रवादी-२, शिवसेना-४, शहर विकास आघाडी -२, भाजपा-०२ असे पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादीच्या २ सदस्यांपैकी एका सदस्यास ओढून काँग्रेसने पहिल्या अडीच वर्षात काँग्रेसचा नगराध्यक्ष बनविला होता. त्यामुळे काँग्रेसकडे ११ सदस्यांचे बहुमत आहे.

Web Title: Paithan, Chief of the Town, elections for the post of Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.