पैठण-औरंगाबाद-वेरूळ रेल्वेमार्ग सर्व्हेतून वगळला

By Admin | Updated: April 15, 2016 01:49 IST2016-04-15T01:27:48+5:302016-04-15T01:49:21+5:30

औरंगाबाद : सोलापूर- जळगाव या रेल्वेमार्गातून पैठण- औरंगाबाद- वेरूळ वगळण्यात आल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पैठण- औरंगाबाद-

The Paithan-Aurangabad-Verul railway route has been excluded | पैठण-औरंगाबाद-वेरूळ रेल्वेमार्ग सर्व्हेतून वगळला

पैठण-औरंगाबाद-वेरूळ रेल्वेमार्ग सर्व्हेतून वगळला


औरंगाबाद : सोलापूर- जळगाव या रेल्वेमार्गातून पैठण- औरंगाबाद- वेरूळ वगळण्यात आल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पैठण- औरंगाबाद- वेरूळ यांचा समावेश असलेल्या सोलापूर- जळगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षणच झाले नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले असून, मध्य रेल्वेने ही माहिती दिली आहे.
मराठवाडा रेल्वेविकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी माहिती अधिकारात सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद- बीड- गेवराई- पैठण- औरंगाबाद- घृष्णेश्वर (वेरूळ) अशा रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे का? याची विचारणा केली. त्यास उत्तर देताना असे कोणतेही सर्वेक्षण केले नसल्याचे उत्तर त्यांना प्राप्त झाले आहे. आठ वर्षांपूर्वी सोलापूर- जळगाव हा पैठण- औरंगाबाद- वेरूळमार्गे जाणारा रेल्वेमार्ग मंजूर झाला होता; परंतु २०१२ मध्ये हा मार्ग जालन्यामार्गे वळविण्यात आला. हा मार्ग पैठण- औरंगाबाद- वेरूळमार्गे मंजूर झाला होता. त्यामुळे तो याचमार्गे जाण्याची गरज आहे. मात्र, राजकीय दबावातून तो जालन्यामार्गे वळविला जात असल्याचे ओमप्रकाश वर्मा म्हणाले.

Web Title: The Paithan-Aurangabad-Verul railway route has been excluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.