माहितीपटातून मांडली कयाधूची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:31 IST2017-09-09T00:31:22+5:302017-09-09T00:31:22+5:30
जिल्ह्यातून वाहणारी एकमेव नदी म्हणून ओळखल्या जाणाºया कयाधूचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. हीच बाब लक्षात घेऊन हिंगोलीतील तरुणांनी अवघ्या ७ मिनीटांच्या माहितीपटातून कयाधू नदीची व्यथा सोशन मीडियासह रॅली फॉर रिव्हर्सच्या माध्यमातून मांडली आहे.

माहितीपटातून मांडली कयाधूची व्यथा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातून वाहणारी एकमेव नदी म्हणून ओळखल्या जाणाºया कयाधूचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. हीच बाब लक्षात घेऊन हिंगोलीतील तरुणांनी अवघ्या ७ मिनीटांच्या माहितीपटातून कयाधू नदीची व्यथा सोशन मीडियासह रॅली फॉर रिव्हर्सच्या माध्यमातून मांडली आहे.
गेल्या अनेक वर्षांमध्ये कयाधू नदी पात्रामध्ये वाढलेले जलप्रदुषण, नदीबाबत शासकीय अनास्था आणि जनतेची संपलेली संवदेनशीलता या कारणामुळे आज नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही बाब तेवढ्याच तीव्रतेने समाजासमोर मांडण्याचे काम हिंगोली शहरातील तरूणांनी अवघ्या ७ मिनिटांच्या माहितीपटातून केले आहे.
हिंगोली येथील गणेश पाटील, अभय भरतिया, भगवान इंगोले, प्रजय कान्हेड, सुनील प्रधान यांनी एकत्र येऊन माहितीपटात या नदीचे वास्तव्य चित्रण मांडले आहे. सोशल मीडियामध्ये संपूर्ण भारतात नदी वाचविण्यासाठी सुरू असलेल्या जनजागृतीसाठी रॅली फॉर रिव्हर्स ही मोहीम कार्यरत आहे. याच माध्यमातून हिंगोलीतील युवकांनी कयाधू नदीचा माहितीपट जगासमोर मांडला आहे. शिवाय हिंगोली जिल्ह्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमयातून हा माहितीपट सर्वत्र प्रसारित झाला असून, नदीबद्दल जागरुकता होण्याबरोबरच युवकांच्या धडपडीचे कौतुक होत आहे.