पीकविम्यावरून गोंधळाची स्थिती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:43 IST2017-07-30T00:43:37+5:302017-07-30T00:43:37+5:30
परभणी : पीक विम्याचे प्रस्ताव दाखल करण्याची मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे़ शेतकºयांची बँकेत गर्दी पाहता जिल्हाधिकाºयांनी शुक्रवारी आॅफलाईनने अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले़ परंतु, शनिवारी जिल्ह्यातील सर्वच बँकांत पीक विम्याचा प्रस्ताव दाखल करून घेण्यासाठी गोंधळाची स्थिती कायम होती़ गंगाखेडात शेतकºयांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले़ तर इतर ठिकाणी पहाटेपासूनच बँकांसमोर शेतकºयांनी रांगा लावल्या होत्या़

पीकविम्यावरून गोंधळाची स्थिती कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पीक विम्याचे प्रस्ताव दाखल करण्याची मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे़ शेतकºयांची बँकेत गर्दी पाहता जिल्हाधिकाºयांनी शुक्रवारी आॅफलाईनने अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले़ परंतु, शनिवारी जिल्ह्यातील सर्वच बँकांत पीक विम्याचा प्रस्ताव दाखल करून घेण्यासाठी गोंधळाची स्थिती कायम होती़ गंगाखेडात शेतकºयांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले़ तर इतर ठिकाणी पहाटेपासूनच बँकांसमोर शेतकºयांनी रांगा लावल्या होत्या़
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत ३१ जुलैपर्यंत खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी मुदत देण्यात आली आहे़ ही मुदत दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे़ त्यामुळे शुक्रवारपासून शेतकरी बँकांमध्ये प्रस्ताव दाखल करण्यासाठी गर्दी करीत आहेत़
आॅनलाईनने प्रस्ताव भरून घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना बँकांसह शेतकºयांना करावा लागला़ शुक्रवारी अनेक संघटनांसह शेतकºयांनी जिल्हा कचेरीवर मोर्चा, निवेदने देऊन आॅफलाईनने अर्ज स्वीकारण्यासाठी भाग पाडले़ परंतु, शनिवारी पहाटेपासूनच शेतकºयांनी आपले प्रस्ताव दाखल करण्यासाठी बँकांसमोर रांगा लावल्या होत्या़ शहरातील जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, भारतीय स्टेट बँक, बँका आॅफ इंडिया, आंध्रा बँक आदी ठिकाणी रांगा लागल्या होत्या़ बँकांच्या जाचक अटींमुळे अनेक शेतकºयांना आपला प्रस्ताव दाखल करता आला नाही़
जिल्ह्यातील सेलू, येलदरी, चारठाणा, मानवत, पाथरी, पालम, पूर्णा, जिंतूर इ. ठिकाणी शेतकºयांना पोलीस बंदाबस्तात पीक विम्याचे प्रस्ताव बँकेत दाखल करावे लागले़ गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे १ किमीच्या रांगा लागल्या होत्या़ त्यामुळे या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला़
संतप्त शेतकºयांनी बँकेचे शटर वाकविल्याने पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली़