पीएसीएलने गुंतवणूकदारांचे 49,100 कोटी परत करावेत
By Admin | Updated: August 24, 2014 01:27 IST2014-08-24T01:27:03+5:302014-08-24T01:27:03+5:30
आणखी एका संस्थेवर सेबीने घाव घातला असून तब्बल 49 हजार 100 कोटी रुपये गुंतवणूकदारांना तीन महिन्यांत परत करण्याचा आदेश दिला आहे

पीएसीएलने गुंतवणूकदारांचे 49,100 कोटी परत करावेत
औरंगाबाद : जिद्द, कठोर मेहनत आणि आत्मविश्वास हीच खरी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याची सूत्रे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने ही सूत्रे अंगिकारावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे यांनी केले.
लोकमतच्या वतीने सिडकोतील संत तुकाराम महाराज नाट्यगृहात आयोजित स्पर्धा परीक्षा संमेलनप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या हजारो तरुण, तरुणींची या संमेलनाला उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून स्पर्धा परीक्षेसंबंधी पुस्तके लिहिणारे, तसेच राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. तुकाराम जाधव, औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक आयपीएस डॉ. बसवराज तेली, लोकमतचे संपादक चक्रधर दळवी, लोकमत मीडिया प्रा. लि.चे उपाध्यक्ष (वितरण) वसंत आवारी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी कोकाटे म्हणाले की, राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) प्रमाणे स्पर्र्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमात बदल केला. त्यामुळे सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा सहज देता येते. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. मात्र, जागा मोजक्याच असतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची संधी केवळ एक, दोन गुण कमी पडल्याने हुकते. तेव्हा विद्यार्थ्यांनी एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देत असताना, बँकिंग आणि अन्य क्षेत्रांतील नोकरीचाही पर्याय निवडावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून आयोग उमेदवाराचा बौद्धिक क्षमतेचा शोध घेते, त्यामुळे उमेदवारांनी आत्मविश्वासने परीक्षांना सामोरे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
राजेंद्र दर्डा यांनी साधला तरुणांशी संवाद...
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संमेलनात सहभागी झालेला प्रत्येक युवक हा उरात एक स्वप्न बाळगून आहे. जे लोक मोठे स्वप्न बघतात तेच यशाचे शिखर सर करतात. औरंगाबाद शहराची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील संधी तर वाढल्या आहेतच त्यासोबतच आव्हानेदेखील वाढली आहेत. ही आव्हाने पेलण्याची क्षमता प्रत्येक युवकाने अंगीकारली पाहिजे, असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी केले. संमेलनात सहभागी झालेल्या युवकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मी जेव्हा येथे आलो होतो, त्यावेळी शहराची लोकसंख्या केवळ अडीच लाख होती. ती आज पंधरा लाख झाली. तेव्हा केवळ घाटी रुग्णालय होते. आता आरोग्याच्या आणि शैक्षणिक सुविधा वाढल्या. मात्र, अजून बरेच काही करायचे आहे. येथील प्रत्येक जण उराशी स्वप्न बाळगून या संमेलनात सहभागी झाला आहे. तुमची ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ‘टीम औरंगाबाद’ प्रयत्न करणार आहे. मोठे स्वप्न बघणाऱ्या आणि ते पूर्ण करण्यासाठी झगडणाऱ्या प्रत्येकाच्या सोबत टीम औरंगाबाद असणार आहे. जोपर्यंत तरुणांची एक टीम तयार होऊन सर्वच सार्वजनिक यंत्रणेवर नजर ठेवत नाही, तोपर्यंत विकास होणार नाही. एक जागरूक युवक म्हणून तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. औरंगाबादला एक जागतिक दर्जाचे शहर बनवू या, टीम औरंगाबादमध्ये सामील होऊ या, असे आवाहन ना. दर्डा यांनी यावेळी केले.
प्रश्नपत्रिका गुरुकिल्ली- प्रा. तुकाराम जाधव
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. तुकाराम जाधव यांनी अधिकारी होण्यासाठी काय करावे, याबाबत अत्यंत मुद्देसूद आणि सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाने प्रथम वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. नियोजनाशिवाय कोणालाही यश मिळू शकत नाही. आयोगाने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाची माहिती दिलेली आहे. त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. आयोगाने आतापर्यंत प्रत्येक विषयाशी संबंधित विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, आयोग विशिष्ट चॅप्टरवरच प्रश्न विचारत असतो. त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिक ाच सर्व उमेदवारांचा खरा गुरू आहेत. स्पर्धा परीक्षेसंबंधी बऱ्याचदा अफवा पसरविण्यात येतात. अधिकारी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून नमूद केले. व्यापक तयारी, शंभर टक्के प्रयत्न आणि स्वत:चे मूल्यमापन केल्यास यशाचा मार्ग सोपा होतो. शिवाय, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे यश कधी पहिल्याच प्रयत्नात मिळते तर कधी वयोमर्यादा संपते तरी यश मिळत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्या आणि एकदा निर्णय घेतला की, आयोगाच्या परीक्षेत देशात पहिला येणारच या आत्मविश्वासानेच तयारी करा अन् यश मिळेपर्यंत मागे पाहू नका, असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
यश मिळेपर्यंत विश्रांती नको -बसवराज तेली
पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीला हजेरी लावणाऱ्या तसेच दुसऱ्या प्रयत्नात आयपीएससाठी निवड झालेले औरंगाबादचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केलेले मार्गदर्शन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुणांना प्रेरणादायी ठरले. कर्नाटक राज्यातील खेडेगावातील जि.प. शाळेत शिकलेले डॉ. तेली यांनी आपल्या भाषणात साधा विद्यार्थी ते आयपीएसपर्यंतचा प्रवास सांगितला. बारावीनंतर एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्यांच्या मोठ्या भावाने अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता बंगळुरू येथे जाऊन यूपीएससी परीक्षेची तयारी केली. सतत आठ वर्षे परीक्षा दिल्यानंतर त्यांना यूपीएससीमध्ये यश मिळाले आणि ते इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिससाठी निवड झाली. त्यावेळी त्यांचा त्यांच्या गावाच्या पंचक्रोशीत ठिकठिकाणी सत्कार समारंभ होत असत. तोपर्यंत यूपीएससी परीक्षेची माहिती नव्हती, असे सांगून मोठ्या भावामुळे आणि आई- वडिलांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे एमबीबीएसनंतर प्रॅक्टीस न करता थेट दिल्ली येथे जाऊन यूपीएससीची तयारी केली. आयएएस व्हायचे हा ध्यास मनात घेऊन अभ्यास करीत असत. मात्र, पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल याची खात्री नव्हती. त्यामुळे पूर्वपरीक्षा दिल्यानंतर दोन महिने विश्रांती घेतली. निकाल लागला तेव्हा मुख्य परीक्षेसाठी पात्र झाल्याचे कळले. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी दोन महिने उरले होते. मात्र, दोन महिन्यांत यश मिळणे अशक्य आहे, असे वाटत होते. तेव्हा कमी गुणांनी ती पास झालो आणि मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. मुलाखतीमध्ये पुरेसे गुण मिळाले नाहीत. तेव्हा समजले की, यश मिळेपर्यंत विश्रांती घेणे किती चुकीचे आहे. त्यानंतर झपाटून तयारीला लागलो आणि एका वर्षात आयपीएस झालो.
याप्रसंगी त्यांनी आयपीएस प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर आलेला अनुभव सांगून निर्णयावर ठाम राहण्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. शिवानंद भानुसे यांनी केले.