गंगापुरात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प होणार कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:23+5:302021-05-05T04:07:23+5:30
सध्या तालुक्यात रोज तीस ते बत्तीस रुग्णांना ऑक्सिजन लागत असून यासाठी दिवसाला पंचवीस ते अठ्ठावीस मोठे सिलिंडर लागतात. एका ...

गंगापुरात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प होणार कार्यान्वित
सध्या तालुक्यात रोज तीस ते बत्तीस रुग्णांना ऑक्सिजन लागत असून यासाठी दिवसाला पंचवीस ते अठ्ठावीस मोठे सिलिंडर लागतात. एका सिलिंडरची क्षमता ६ हजार लिटर असून दिवसाला येथे १ लक्ष ८० हजार लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयाचा स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. यासाठी ४२ लक्ष ७२ हजार रुपये मंजूर केले आहेत. गेल्या आठवड्यात येथील डॉक्टर व नागरिकांनी ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जिल्हाधिकारी यांच्या दौऱ्याप्रसंगी निदर्शनास आणून दिला होता त्या अनुषंगाने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी एका पथकाने येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली असून काम सुरू करण्यास मान्यता दिली असल्याचे समजते.
चौकट
प्रतितासाला २० हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती होणार
गंगापूर येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पातून प्रतितासाला २० क्यूबिक मीटर म्हणजे २० हजार लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. म्हणजे दिवसाकाठी साधारणतः २ लक्ष लिटर ऑक्सिजन मिळणार असल्याने रुग्णालय कर्मचारी, डॉक्टर व रुग्णांना दिलासा मिळणार आहे.