शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार सभासद मतदानाला मुकणार

By admin | Updated: September 26, 2014 00:43 IST

रामेश्वर काकडे, नांदेड सभासद थकबाकीदार असेल तर सहकार कायद्याच्या नवीन बदलानुसार मतदानाचा अधिकार नाकारला आहे.

रामेश्वर काकडे,  नांदेडेसहकारी संस्थांच्या निवडणुकीत मतदान करावयाचे झाल्यास संबंधित सभासद थकबाकीदार असेल तर सहकार कायद्याच्या नवीन बदलानुसार मतदानाचा अधिकार नाकारला आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश थकबाकीदार सभासद मतदानाला मूकणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या तसेच विविध सहकारी संस्था यांच्या निवडणुका येत्या नोव्हेंबर महिन्यात होण्याचे संकेत आहेत. याकामी सहकारी यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली आहे. राज्यात सध्या विधानसभा निवडणुका सुरु असून या निवडणुका पार पडल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा बँकेची तर त्यानंतर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. यासाठी सभासद यादी (आय) नमून्यात तयार करण्याचे काम संस्थाकडून सुरु असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक व्ही. डी. कहाळेकर यांनी दिली.नांदेड जिल्हा बँक डबघाईस येवून बंद पडल्यानंतर २००५ पासून जिल्हा बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र आता तब्बल दहा वर्षानंतर या बँकेची निवडणूक होणार असल्याने सर्वच सभासद कामाला लागले असून या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांची भूमिकाही महत्वाची राहणार आहे. मध्यवर्ती बँकेच्या चाव्या आपल्या हातात कशा येतील यासाठी पक्षांचा हस्तक्षेप वाढल्याने रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.जिल्हा बँकेचे मतदार बँकेचे सभासद, सेवा सहाकारी सोसायटयांचे तसेच इतर सर्व सहकारी संस्थाचे सभासद हे मतदार आहेत. मात्र ज्या सभासदाने जिल्हा बँकेतील शेअर्सची रक्कम पूर्ण भरली त्याच मतदाराला मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे.जिल्ह्यात एकूण ९८१ विविध कार्यकारी सहकारी संस्था असून यापैकी ९५९ संस्था निवडणुकीसाठी पात्र आहेत. यातील ६३७ संस्थांच्या निवडणूका पार पडलेल्या आहेत. त्यातील २४९ सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर कार्यकाळ संपलेल्या उर्वरित ३५५ सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या नोव्हेंबर महिन्यात लागण्याचे संकेत आहेत.नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असलेल्या तालुकानिहाय सहकारी संस्थांची संख्या अशी - हदगांव २३, भोकर २२, किनवट ५४, माहुर २२, लोहा ५२, कंधार २२, देगलूर ३०, मुखेड ५, अर्धापूर ८, नांदेड ८, मुदखेड २४, नायगांव ३४, धर्माबाद ३ तर बिलोली तालुक्यातील १५ या व इतर अशा ३५५ सहकारी संस्थांंचा समावेश आहे.