छत्रपती संभाजीनगर : पदमपुरा परिसरात एका विकृत खासगी शिकवणी घेणाऱ्या ५५ वर्षीय शिक्षकाने तीनवर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. मंगळवारी रात्री ११:०० वाजता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मात्र, वेदांतनगर परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने हतबल पोलिसांना मध्यरात्री उशिरा ०२:०० वाजेपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
सूत्रांच्या माहितीनुसार, पदमपुरा परिसरात एक व्यक्ती काही वर्षांपासून खासगी शिकवणी (ट्यूशन) घेतो. याच परिसरात राहणारी तीनवर्षीय चिमुकली मंगळवारी सायंकाळी रडत आई- वडिलांकडे गेली. पालकांनी विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. एकाच परिसरात असल्याने चिमुकली व संशयित आरोपीचा एकमेकांच्या ओळखीचे होते. स्थानिकांच्या माहितीनुसार, त्या शिक्षकाने मुलीला बोलावून घेतले. एकाच परिसरातील असल्याने चिमुकलीदेखील त्याच्याकडे सहज गेली. त्यानंतर संशयिताने हा विकृतपणा केला.
घटनेची माहिती कळताच चिमुकलीच्या कुटुबीयांसह स्थानिकांचा मोठा जमाव वेदांतनगर पाेलिस ठाण्यात दाखल झाला. मात्र, वीजपुरवठा खंडित झाल्याने याप्रकरणी प्रक्रिया पार पाडण्यास विलंब झाला. संशयिताचे नाव जीवनवाल असून, त्याचे वय साधारण ५५ असल्याचे पोलिस ठाण्यात उपस्थित ॲड. पंकज बनसोडे यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री ०२:०० वाजेनंतरही सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Summary : A shocking incident occurred in Chhatrapati Sambhajinagar where a 55-year-old tutor abused a three-year-old girl. The crime came to light Tuesday night. Power outage hampered police efforts to file the case, which was completed late into the night. The accused, identified as Jeevanwal, is in custody.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में एक चौंकाने वाली घटना सामने आई है जहाँ एक 55 वर्षीय ट्यूशन शिक्षक ने तीन साल की बच्ची का यौन शोषण किया। घटना मंगलवार रात सामने आई। बिजली गुल होने से पुलिस को मामला दर्ज करने में परेशानी हुई, जिसे देर रात पूरा किया गया। आरोपी जीवनवाल हिरासत में।