तेर येथील जैन मंदिरात चातुर्मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
By Admin | Updated: July 12, 2014 01:16 IST2014-07-12T00:19:00+5:302014-07-12T01:16:02+5:30
तेर : येथील जैन मंदिरात चातुर्मासानिमित्त चार महिने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तेर येथील जैन मंदिरात चातुर्मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
तेर : येथील जैन मंदिरात चातुर्मासानिमित्त चार महिने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जैन बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात प्रथम चातुर्मास होत आहे. यामध्ये जैन तपस्वी प.पू. पवित्र सागर महाराज यांच्या उपस्थितीत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. १३ जुलै रोजी मंगल कलश स्थापना होणार असून, यावेळी पुणे येथील उद्योजक अजितकुमार प्रेमचंद सांगोले यांच्या हस्ते कलशपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी मंदिर समिती अध्यक्ष राजन देशमाने उपाध्यक्ष राजीव बुबणे, महामंत्री बाबूराव पांगळ, कोषाध्यक्ष ओमप्रकाश देवधरे आदींची उपस्थिती राहणार असल्याचे सहसचिव राजकुमार जगधने, अशोक संगवे, रमेश रामढवे, अनिता संगवे यांनी कळविले आहे. (वार्ताहर)
गुरूपौर्णिमा उत्सवाचे आयोजन
उस्मानाबाद : तालुक्यातील वलगुड येथे विठ्ठल-रूक्मीणी मंदिरात आषाढी गुरूपौर्णिमेनिमित्त ११ व १२ जुलै रोजी विवधि कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. पांडुरंग महाराज जाधव चिलवडीकर यांचे कीर्तन तर रात्री अकरापासून सामुहिक जागर होणार आहे. १२ रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत दिंडी मिरवणूक काढण्यात येणार असून, सकाळी १० ते १२ या वेळेत उंबरे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
तेर : येथील राम मंदिरात गुरूपौर्णिमेनिमित्त शनिवारी श्री गुरू पादुका पूजन व पद्मनाथ महाराज व्यास यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर प्रार्थना व महाप्रसादाने याची सांगता होणार आहे. गुरूपादुका पूजनानंतर ग्रंथराज श्री दासबोधांतर्गत श्री सद्गुरू स्तवन समाजाचे सामुहिक पारायणही होणार असल्याचे अमोल महाराज रामदास यांनी सांगितले.