दोन दिवसीय झेप साहित्य संमेलनाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:48+5:302020-12-17T04:26:48+5:30

तसेच विजयकुमार कस्तुरे, सज्जन टाकसाळे, संजय मोहिते, बबन महामुने, छाया बैसाने, दीपक सोनवणे, किरण डोंगरदिवे, राजेंद्र सपकाळ, टी. एस. ...

Organizing a two-day leap literature convention | दोन दिवसीय झेप साहित्य संमेलनाचे आयोजन

दोन दिवसीय झेप साहित्य संमेलनाचे आयोजन

तसेच विजयकुमार कस्तुरे, सज्जन टाकसाळे, संजय मोहिते, बबन महामुने, छाया बैसाने, दीपक सोनवणे, किरण डोंगरदिवे, राजेंद्र सपकाळ, टी. एस. चव्हाण, त्र्यंबक बरकले यांना प्राचार्य एम. डी. कड पाटील यांच्या हस्ते मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

दु. १ वा. सतीशचंद्र रोठे यांच्या अध्यक्षतेखाली ‘लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य व साहित्य’ हा परिसंवाद होईल. दु. २ वा. कथाकार कडुबा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होईल. दु. ३ वा. कवयित्री अनिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाला सुरुवात होईल, तर सायं. ४ वा. ज्येष्ठ शाहिरी कलावंत विजयकुमार कस्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली लोककलावंतांचा लोकोत्सव होईल.

दोन दिवस होणाऱ्या भरगच्च कार्यक्रमानंतर दि. २० रोजी सायं. ५ वा. बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते आणि झेप साहित्य चळवळीचे विश्वस्त प्राचार्य आनंद हिवाळे यांच्या भाषणाने संमेलनाचा समारोप होईल. साहित्यप्रेमींनी संमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन झेप साहित्य चळवळीचे संस्थापक डी. एन. जाधव, स्वागताध्यक्ष शिवाजी धोंगडे, निमंत्रक प्राचार्य पंढरीनाथ शेळके, संयोजन समिती अध्यक्ष मधुकर वाकोडे यांनी केले आहे.

Web Title: Organizing a two-day leap literature convention