३ मार्चपासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:48 IST2018-02-24T00:48:00+5:302018-02-24T00:48:14+5:30
सकल मारवाडी युवा मंचतर्फे ३ ते ११ मार्चदरम्यान राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ मैदानावर होणार आहे. स्पर्धेत औरंगाबादसह राज्यभरातील एकूण १८ संघांनी सहभाग निश्चित केला आहे.

३ मार्चपासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
औरंगाबाद : सकल मारवाडी युवा मंचतर्फे ३ ते ११ मार्चदरम्यान राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ मैदानावर होणार आहे. स्पर्धेत औरंगाबादसह राज्यभरातील एकूण १८ संघांनी सहभाग निश्चित केला आहे, अशी माहिती संयोजक कैलास जैन व दीपेश जळगाववाला यांनी दिली.
ही स्पर्धा टेनिस बॉलवर आणि प्रत्येक सामना १० षटकांचा राहणार आहे. कलर ड्रेसवर होणारी ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने होणार आहे. विजेत्या संघाला एक लाख रुपये, चषक आणि उपविजेत्या संघाला ५० हजार रोख व चषक बक्षीस देण्यात येईल. त्याचप्रमाणे वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किशोर चोरडिया, निखिल मित्तल, डॉ. राज चोपडा, आशिष अग्रवाल, अमित भोमा, पंकज कलंत्री, निखिल खंडेलवाल, गोविंद शर्मा, राजेश शर्मा आदी परिश्रम घेत आहेत.