औरंगाबादेत चारदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन
By Admin | Updated: August 28, 2014 00:22 IST2014-08-28T00:19:08+5:302014-08-28T00:22:43+5:30
चारदिवसीय राज्यस्तरीय परिषद डॉक्टरांसाठी आयोजित केली आहे. ही माहिती परिषदेचे चेअरमन डॉ. आनंद निकाळजे यांनी दिली.

औरंगाबादेत चारदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन
औरंगाबाद : इंडियन सोसायटी आॅफ क्रिटिकल केअर मेडिसीन, शाखा औरंगाबाद आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चारदिवसीय राज्यस्तरीय परिषद डॉक्टरांसाठी आयोजित केली आहे. ही माहिती परिषदेचे चेअरमन डॉ. आनंद निकाळजे यांनी दिली.
परिषद १८ ते २१ सप्टेंबरदरम्यान एमजीएम रुक्मिणी हॉल येथे विविध सत्रांत होणार आहे. परिषदेत अतिदक्षता विभागातील विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. शिरीष प्रयाग, डॉ. शिवकुमार अय्यर, डॉ. अशित हेगडे, डॉ. अतुल कुलकर्णी आणि आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. १८ व १९ सप्टेंबर रोजी प्रिकॉन्फरन्स वर्कशॉप होणार आहे. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता खुले चर्चासत्र एमआयटी हॉस्पिटलमध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांना उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांना प्रश्न विचारता येणार आहे. परिषदेसाठी डॉक्टरांनी नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. निकाळजे यांनी केले. पत्रपरिषदेला डॉ. समीध पटेल, डॉ. सुनील धुळे, डॉ. नहूश पटेल उपस्थित होते.