संघटित गुन्हेगारी; चार आरोपींवर मोक्का
By Admin | Updated: May 10, 2014 23:48 IST2014-05-10T23:46:04+5:302014-05-10T23:48:59+5:30
जालना : येथील चंदनझीरा भागात राहून संघटित होऊन गुन्हेगारी करणार्या चौघांवर विशेष कृती दलाच्या पथकाने कारवाई केली.

संघटित गुन्हेगारी; चार आरोपींवर मोक्का
जालना : येथील चंदनझीरा भागात राहून संघटित होऊन गुन्हेगारी करणार्या चौघांवर विशेष कृती दलाच्या पथकाने कारवाई केली. कदीम जालना पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. एकाला अटकही करण्यात आली. विशेष कृती दलाचे जमादार एम.बी. स्कॉट यांनी गेल्या काही दिवसांपासून या टोळीवर लक्ष केंद्रीत केले होते. त्यांच्या हालचाली टिपून सबळ पुरावा गोळा केला. वरिष्ठांना सदर प्रकरणात सविस्तर अहवाल दिल्यानंतर किशोर रतन जाधव या अट्टल आरोपीला पकडले. त्याचा जबाब नोंदवून त्याच्यासह गणेश धोंडीराम गायकवाड, शेख एजाज उर्फ हड्डी, शेख इसाक, कृष्णा जाधव अशा एकूण चौघांवर गुन्हा दाखल केला. चौघेही आरोपी गेल्या ९ वर्षांपासून एकत्रित येऊन संघटित पद्धतीने गुन्हेगारी करीत असल्याचे तपासून समोर आले. या टोळीने घरफोडी, चोरी, जबरी चोरी आदी प्रकारचे गुन्हे केल्याचे कदीम जालना पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सहायक उपनिरीक्षक श्रीमंत ठोंबरे पाटील करीत आहेत. दरम्यान, संघटीत गुन्हेगारी करणार्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी पोलिसांना दिली आहे.