लोकमत सखी महोत्सवाचे १७ मे रोजी आयोजन
By Admin | Updated: May 15, 2014 00:27 IST2014-05-15T00:21:52+5:302014-05-15T00:27:33+5:30
औरंगाबाद : लोकमत सखी मंचतर्फे महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सखी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने महिलांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

लोकमत सखी महोत्सवाचे १७ मे रोजी आयोजन
औरंगाबाद : लोकमत सखी मंचतर्फे महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सखी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने महिलांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. शनिवार, दि. १७ मे रोजी लोकमत हॉल, लोकमत भवन, जालना रोड येथे सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या अंगी विविध कलागुण असतात. काही महिला कलेची जोपासना करतात. काही महिला दैनंदिन जीवनात वेळ मिळत नसल्यामुळे आपल्या कलागुणांकडे दुर्लक्ष करतात. महिलांच्या कलागुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सखी मंचने पुढाकार घेतला आहे. सखी महोत्सवात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात समूह रांगोळी, ब्रायडल मेकअप, फॅन्सी ड्रेस, सोलो नृत्य आणि मेंदी स्पर्धेचा समावेश आहे. स्पर्धक महिलांसाठी नियमावली समूह रांगोळी स्पर्धा (४ बाय ४ स्क्वे फूट) यात एका ग्रुपमध्ये कमीत कमी २ किंवा जास्तीत जास्त ४ स्पर्धक महिला असाव्यात. रांगोळीसाठी लागणारे सर्व साहित्य स्वत: आणावे. चाळणी व गाळणीचा वापर करता येणार नाही. प्रत्येक स्पर्धकाला एक तासाचा वेळ दिला जाणार आहे. ब्रायडल मेकअपसाठी मॉडेल स्वत: आणावे. स्पर्धकास एक तासाचा वेळ देण्यात येईल. फॅन्सी ड्रेसमध्ये ३० सेकंदाचा वेळ परिचयासाठी दिला जाईल. सोलो डान्सला वेळ २ मिनिटे, मेंदी स्पर्धेमध्ये एका सखीने दुसर्या सखीच्या हातावर मेंदी काढावी. या स्पर्धेसाठी ४५ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. प्रत्येक स्पर्धेसाठी लागणारी सी.डी. अथवा वादक यांची व्यवस्था स्वत: करावयाची आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी लोकमत भवन, जालना रोड, औरंगाबाद येथे किंवा ९५५२५६४५६० या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. बक्षिसांचे प्रायोजकत्व सुवर्ण स्पर्श ज्वेलर्सने स्वीकारले आहे. तसेच सहभागी स्पर्धकांनादेखील बक्षिसे देण्यात येणार आहेत. याचे प्रायोजकत्व रवी मसालेने स्वीकारले आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश मागच्या गेटने देण्यात येणार आहे. सखी सम्राज्ञी स्पर्धेची प्राथमिक फेरी आज ४घरसंसार सांभाळत असताना महिलांना आपले कलागुण जोपासण्यास वेळ मिळेलच याची खात्री नसते. अनेक महिलांना कलागुण दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. अशा महिलांसाठी व्यासपीठ मिळवून देण्याचे काम लोकमत सखी मंचतर्फे करण्यात येत आहे. लोकमत सखी मंचने ‘सखी सम्राज्ञी स्पर्धा’ आयोजित केली असून, या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरुवात गुरुवार, दि. १५ मे रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. स्पर्धकांनी सकाळी १०.३० वाजता लोकमत हॉल, लोकमत भवन, जालना रोड येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.