भू-करमापकाच्या निलंबनाचे आदेश
By Admin | Updated: April 16, 2015 00:58 IST2015-04-16T00:55:05+5:302015-04-16T00:58:25+5:30
उस्मानाबाद : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ साठी अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. परंतु, अनेक शेतकऱ्यांनी जमिनीचे मोजमाप

भू-करमापकाच्या निलंबनाचे आदेश
उस्मानाबाद : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ साठी अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. परंतु, अनेक शेतकऱ्यांनी जमिनीचे मोजमाप व झाडांची संख्या कमी गणल्याबाबत तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांची चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीमध्ये संबंधित अधिकारी दोषी आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उमरगा कार्यालयातील भू-करमापक अधिकारी पी.आर. गुरमे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ जात असल्याने त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यात जमिनीचे क्षेत्र कमी मोजल्याने अनेक शेतकऱ्यांना मावेजा कमी भेटल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला आल्या होत्या. तसेच त्यात काही शेतकऱ्यांच्या झाडांची नोंद न घेणे, मोजणीत चुका झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकांरी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संबधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी पथकांची नियुक्ती केली होती. तसेच पथकाचा अहवाल भूसंपादन कार्यालयास प्राप्त झाला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी उमरगा येथील भू-करमापक अधिकारी पी.आर. गुरमे यांना निलंबित करण्याचे आदेश नारनवरे यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)