वाळू चोरी रोखण्यासाठी नवीन दक्षता पथक स्थापन करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:15+5:302021-05-05T04:07:15+5:30
पैठण तालुक्यात गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्याकरिता उपविभागीय अधिकारी पैठण, फुलंब्री यांच्या अधिपत्याखाली गौण खनिज दक्षता पथक ...

वाळू चोरी रोखण्यासाठी नवीन दक्षता पथक स्थापन करण्याचे आदेश
पैठण तालुक्यात गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्याकरिता उपविभागीय अधिकारी पैठण, फुलंब्री यांच्या अधिपत्याखाली गौण खनिज दक्षता पथक गठीत करण्यात आलेले आहे.या पथकातील काही अधिकारी व कर्मचारी सद्यस्थितीत कोविड पाॅझिटिव्ह आलेले आहेत. तर काही कर्मचारी हे इतर कारणास्तव रजेवर आहेत. यामुळे सद्यस्थितीत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन पथकांमध्ये नवीन कर्मचारी नेमून सुधारित पथके गठीत करावेत असे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. नवीन दैनिक गौण खनिज पथक गठीत करुन सदर पथकात अतिरिक्त पोलीस पाटील व कोतवाल याचा समावेश करण्यात यावा व गठीत केलेल्या पथकाचा अहवाल या कार्यालयास त्वरित सादर करावा असे उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
चौकट
वाळूचे सर्रास उत्खनन
पैठण तालुक्यात गौण खनिज दक्षता पथक कोमात गेल्याने वाळू तस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जुने कावसान, पाटेगाव, वडवाळी, नायगाव, नवगाव, तुळजापूर, हिरडपुरी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू झाला आहे. दररोज लाखो रुपयाचा महसूल बुडवून हजारो ब्रास वाळूचे दिवसा ढवळ्या उत्खनन सुरू आहे.