शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

विभागप्रमुखांना मुक्कामी राहण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2016 23:28 IST

नांदेड : दुष्काळाने होरपळलेल्या गावात जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांना महिन्यातून किमान पाच मुक्काम करण्याचे आदेश देण्यात आल आहेत़

नांदेड : दुष्काळाने होरपळलेल्या गावात जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांना महिन्यातून किमान पाच मुक्काम करण्याचे आदेश देण्यात आल आहेत़ संबंधित गावातील समस्यांची सोडवणूक करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत़ यासंदर्भात कासराळी ता़ बिलोली येथे झालेल्या स्थायी समितीच्या सभेत निर्णय घेण्यात आला़ जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा प्रथमच मुख्यालयाबाहेर कासराळी येथे घेण्यात आली़ सभेला अध्यक्ष मंगला गुंडले, उपाध्यक्ष दिलीप धोंडगे, सभापती स्वप्निल चव्हाण, सभापती संजय बेळगे, सभापती दिनकर दहिफळे , मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासह सर्व स्थायी समितीचे सदस्य व विभागप्रमुख, अधिकारी यांची उपस्थिती होती़ दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्यांची पाहणी करून त्यावर निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची सभा प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर घेण्यात आली़ स्थायी सभेत सर्व विभागप्रमुखांना महिनाभरात ग्रामपंचायतीच्या ठिकाणी पाच मुकामी राहण्याचे आदेश देण्यात आले़ पाणीटंचाई, शिक्षण, आरोग्य, कृषी, रस्ते या विषयावर संबंधित विभाग प्रमुख गावात जाऊन नागरिकांसोबत चर्चा करतील़ तसेच संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी उपाय योजना करतील़ दुष्काळकाळात ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ हा उपक्रम राबवून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जि़ प़ उपाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी दिली़ स्थायी सभा प्रथमच बाहेर घेण्यात आल्याबद्दल दिलीप धोंडगे म्हणाले, ग्रामीण भागातील प्रश्न घेऊन नागरिक जिल्हा परिषदेत येतात़ मात्र जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारीच आता जनतेच्या दारी जाऊन त्यांचे प्रश्न सोडविणार आहेत़ त्यामुळे कोणताही बिनकामाचा खर्च न करता कासराळी येथे पहिली सभा घेण्यात आली़ यापुढील सभा कंधार तालुक्यातील बाचोटी येथे होणार असल्याचेही ते म्हणाले़ दरम्यान, कासराळी येथे झालेल्या सभेत सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला़ त्यानंतर नवनिर्वाचित स्थायी सदस्यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला़ पाणीटंचाईवर चर्चा करून तहानलेल्या गावांना तातडीने पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले़ समाजकल्याण विभागातील दलित वस्तीच्या निधीसंदर्भात समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांना विचारणा करण्यात आली़ वैयक्तिक लाभाच्या ४ कोटींच्या निधी वितरणावरूनही पदाधिकाऱ्यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ (प्रतिनिधी)