शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच विक्रम काळे यांना विरोध, प्रदीप सोळुंके यांनीही मागितली उमेदवारी

By स. सो. खंडाळकर | Updated: January 3, 2023 13:11 IST

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचाही विक्रम काळे यांना विरोध असल्याचे समजते.

औरंगाबाद : या महिन्यात होणाऱ्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विद्यमान विक्रम काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच विरोध होत आहे. दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचाही विक्रम काळे यांना विरोध असल्याचे समजते.

या मतदारसंघावर पूर्वी मराठवाडा शिक्षक संघाची पकड होती. डी. के. देशमुख, प. म. पाटील, पी. जी. दस्तुरकर, राजाभाऊ उदगीरकर यांनी या मतदारसंघावर विजय मिळवला होता, पण तो दिवंगत वसंत काळे यांनी रोखला. या निवडणुकीत सरळसरळ पक्षीय राजकारण सुरू झाले. एवढेच नव्हे तर निवडणूक म्हटल्यानंतर त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी सुरू झाल्या. त्यामुळे मराठवाडा शिक्षक संघाचे येथे काही चालले नाही. उमेदवार उभे राहत गेले, पण त्यांचा पराभव होत गेला.

पक्ष तिकीट नाकारणार नाही, ही अपेक्षा...वडील वसंत काळे यांच्यानंतर विक्रम काळे यांनी या मतदारसंघावरची पकड घट्ट केली. शिक्षक दरबारसारखे उपक्रम राबविले. या मतदारसंघात अनेकदा त्यांनी संधी घेतली आणि ते विजयी होत गेले. यावेळेस विक्रम काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच विरोध वाढतोय. राष्ट्रवादीच्या वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रदीप सोळुंके यांनी प्रभावी काम केले. आता त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहून शिक्षक आमदारकीचे तिकीट मागितले आहे. त्यामुळे तिकीट मिळवण्यापासून चुरस निर्माण झालेली दिसते. पक्ष तिकीट कापणार नाही असे वाटते, असा विश्वास सोळुंके यांनी व्यक्त केला आहे. सोळुंके हे प्रसिद्ध व्याख्याते आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. राष्ट्रवादी शिक्षक संघटनेची स्थापना करून या संघटनेचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले. २००० मध्येच त्यांचा निवडणूक लढवण्याचा विचार होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट न मिळाल्यास काय करायचे याचाही ते विचार करीत आहेत. सध्या प्रदीप सोळुंके हे विक्रम काळे यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत, अशी जोरदार चर्चा आहे.

माझ्याच कार्याचा परिणाम...जयंत पाटील यांना लिहिलेल्या पत्रात सोळुंके म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात मराठवाडा शिक्षक मतदारसंघ येऊ शकतो, याकडे मी पक्षाचे लक्ष केंद्रित करून २००० मध्ये मी राष्ट्रवादी शिक्षक संघटना स्थापन करण्याची विनंती केली होती. त्यानुसार ८ फेब्रुवारी २००० रोजी मला पक्षाने या संघटनेचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र दिले. माझ्या कार्याचा परिणाम म्हणून हा मतदारसंघ कायमचा आपल्या ताब्यात आहे, हे सांगायलाही सोळुंके विसरले नाहीत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMarathwadaमराठवाडाSatish Chavanसतीश चव्हाणVikram Kaleविक्रम काळे