शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

विद्यापीठात १४ वर्षांनी होणाऱ्या प्राध्यापक भरतीला सत्ताधाऱ्यांचा विरोध

By राम शिनगारे | Updated: August 29, 2023 14:05 IST

कुलगुरू कार्यकाळ चार महिने राहिल्याचे निमित्त

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल १४ वर्षांनी होणारी प्राध्यापक भरती थांबविण्याची मागणी सत्ताधारी भाजप निगडित विद्यापीठ विकास मंचने निवेदनाद्वारे केली आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ चार महिने राहिला असून, कुलसचिव पूर्णवेळ नसल्यामुळे भरतीप्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाचे प्रमुख कुलपतीचे व्यवस्थापन परिषदेवरील प्रतिनिधी डॉ. गजानन सानप यांच्या नेतृत्वात ही मागणी करण्यात आली आहे.

विद्यापीठात २००८ साली प्राध्यापकांची भरती झाली होती. त्यानंतर १४ वर्षांनी ७३ जागा भरण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने भरतीची प्रक्रिया सुरू केली. विद्यापीठात प्राध्यापकांच्या तब्बल १५० जागा रिक्त आहेत. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्राध्यापक नसल्यामुळे २४५ जणांना तासिका तत्त्वावर नेमले आहे. त्यासाठी विद्यापीठात फंडातून २ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी खर्च होतो. पूर्णवेळ प्राध्यापक नसल्यामुळे विद्यापीठाची संशोधनासह एनआयआरएफ रॅकिंगमध्ये घसरण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या प्राध्यापक भरतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विद्यापीठ विकास मंचतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले की, सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचे कलम-१०२ नुसार कुलगुरू सक्षम निवड समितीचे अध्यक्ष असतात. पण, ते ३१ डिसेंबर रोजी निवृत्ती होणार आहेत. त्यांचे आता ४ महिने शिल्लक आहेत. कुलसचिव डॉ. भगवान साखळे प्रभारी आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया थांबविण्यात यावी, अशी मागणी केली. निवेदनावर डॉ. सानप यांच्यासह मंचच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगिता होके पाटील, राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य मनोज शेवाळे, अरविंद केंद्रे, केदार राहणे, नाना गोडबोले, अधिसभा सदस्य डॉ. वैशाली खापर्डे, कुलगुरू नियुक्त अधिसभा सदस्य सुधाकर चव्हाण, विद्या परिषद सदस्य डॉ. व्यंकटेश लांब आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावर विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

...तर पुढील वर्षीही होणार नाही भरतीविद्यापीठ विकास मंचची मागणी मान्य केल्यास पुढील वर्षीही भरती होऊ शकणार नाही. ३१ डिसेंबरपर्यंत विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ असेल. त्यांच्यानंतर पुढील वर्षी पूर्णवेळ कुलगुरू मिळेपर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहिता लागू होतील. आगामी वर्ष निवडणुकीचे असल्यामुळे भरती होण्याची शक्यता दुरापास्त होईल, असे विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थी