शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

मराठवाड्याला पाणी सोडण्यास विखे-कोल्हेंचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:01 PM

वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी सहकारी साखर कारखाना यांनी सोमवारी (दि.२९) सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान तीव्र विरोध केला.

ठळक मुद्देउसासाठी पाणी हवे : सर्वोच्च न्यायालयात केली मागणी

औरंगाबाद : वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना आणि संजीवनी सहकारी साखर कारखाना यांनी सोमवारी (दि.२९) सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान तीव्र विरोध केला.या अर्जांवर न्या. मदन लोकूर, न्या. अब्दुल नजीर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठात सोमवारी प्राथमिक सुनावणी झाली. बुधवारी (दि.३१) यासंदर्भात सविस्तर सुनावणी होणार आहे.कोणत्याही धरणातील पाण्याचा साठा ६५ टक्क्यांच्या खाली गेल्यास पाणीवाटप समितीच्या (एमडब्ल्यूआरआरए) मार्गदर्शक तत्त्वानुसार वरच्या धरणांतून त्या धरणात पाणी सोडले जाते. त्यानुसार १५ आॅक्टोबर रोजी झालेल्या पाहणीत जायकवाडी धरणात केवळ ३६.६३ टक्के पाणीसाठा असल्याचे आढळले. म्हणून गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी २३ आॅक्टोबर रोजी वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा आदेश दिला.या निर्णयाविरुद्ध अहमदनगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना आणि कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज (आयए) दाखल करून त्यांच्या परिसरात कमी पाऊस पडल्यामुळे उसासाठी पाणी हवे. वरच्या धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, अशी विनंती केली आहे.जायकवाडी धरणात पाणी सोडावे, अशी विनंती मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह अशासकीय संस्थांनी (एनजीओ) हस्तक्षेप अर्जांद्वारे केली आहे. तर जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास पाणीवाटप समिती आणि महाराष्टÑ शासनाने अनुकूलता दर्शविली आहे. जायकवाडी धरणात सध्या ३६.६३ टक्के पाणीसाठा असल्यामुळे खरीप हंगाम आणि पुढील मान्सूनचा विचार करता वरच्या धरणांतून पाणी सोडावे, असे वरील सर्वांचे म्हणणे आहे.विखे साखर कारखान्यातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, संजीवनी कारखान्यातर्फे अ‍ॅड. एम. वाय. देशमुख, गोदावरी महामंडळातर्फे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण, अ‍ॅड. व्ही. कृष्णमूर्ती आणि अ‍ॅड. प्रशांत पद्मनाभन काम पाहत आहेत. त्यांना अ‍ॅड. चैताली चौधरी-कुट्टी सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयWaterपाणी