शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीसाठी उद्यापर्यंत ‘रिव्हर्ट बॅक’ची संधी; ‘राईट टू गिव्ह अप’मुळे हजारो विद्यार्थी वंचित

By विजय सरवदे | Updated: June 29, 2024 16:40 IST

अनेक विद्यार्थ्यांनी चुकून या बटनावर क्लिक केल्यामुळे त्यांच्यावर शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे

छत्रपती संभाजीनगर : महाडीबीडी पोर्टलवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरताना अनावधानाने ‘राईट टू गिव्ह अप’ या बटनवर क्लिक केलेले जिल्ह्यातील जवळपास एक हजार, तर राज्यातील हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले होते. दरम्यान, या संदर्भात विद्यार्थी संघटनांनी केलेल्या आंदोलनाच्या रेट्यामुळे समाज कल्याण विभागाने आता ‘रिव्हर्ट बॅक’ची संधी दिली आहे. यासाठी ३० जूनपर्यंत महाडीबीटी पोर्टल सुरू ठेवण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जाती, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीअंतर्गत शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, निर्वाह भत्ता दिला जातो. मात्र, यंदा पहिल्यांदाच महाडीबीटी पोर्टलवर गॅस अनुदान सोडण्यासाठी दिलेल्या पर्यायाच्या धर्तीवर स्वेच्छेने शिष्यवृत्ती सोडण्यासाठी राज्य शासनाने ‘राइट टू गिव्हअप’चे बटन दिले होते. अनेक विद्यार्थ्यांनी चुकून या बटनावर क्लिक केल्यामुळे त्यांच्यावर शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली होती. 

हे बटन क्लिक केल्यामुळे जिल्ह्यातील अनुसूचित जातीचे सुमारे ४ हजार ५००, तर ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द झाले होते. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी राज्यभरात विद्यार्थी आणि लोकप्रतिधिनींनी जोर लावल्यामुळे समाज कल्याण विभागाने अखेर ‘रिव्हर्ट बॅक’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. विद्यार्थ्यांनी ३० जूनपर्यंत आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून प्राचार्य लॉगिनमधून आपला अर्ज ‘रिव्हर्ट बॅक’ करून घेणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर या तारखेच्या आतच विद्यार्थ्यांच्या लाॅगइनमधून ऑनलाइन फेरसादर करावा लागणार आहे.

ऑनलाइन फेर सादर करणे गरजेचेविद्यार्थ्यांना या दोन दिवसांतच महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधून प्राचार्य लॉगइनमधून अर्ज ‘रिव्हर्ट बॅक’ करून घ्यावा लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल. ‘रिव्हर्ट बॅक’ झालेला अर्ज याच मुदतीत विद्यार्थ्यांच्या लाॅगइनमधून ऑनलाइन फेर सादर करणे गरजेचे आहे. ३० जूननंतर ‘रिव्हर्ट बॅक’ची सुविधा आणि सन २०२३-२४ साठी आतापर्यंत परिपूर्ण अर्ज सादर करण्याची मुदत संपुष्टात येणार आहे, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी. जी. वाबळे यांनी कळविले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणScholarshipशिष्यवृत्ती