पोलिस भरतीत अपात्र उमेदवारांना पुन्हा मिळणार संधी
By Admin | Updated: June 8, 2014 00:54 IST2014-06-08T00:51:29+5:302014-06-08T00:54:52+5:30
नांदेड : जिल्हा पोलिस दलाची शुक्रवारपासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे़, परंतु पहिल्याच दिवशी या भरतीला तीनशेहून अधिक जणांनी दांडी मारली़

पोलिस भरतीत अपात्र उमेदवारांना पुन्हा मिळणार संधी
नांदेड : जिल्हा पोलिस दलाची शुक्रवारपासून भरती प्रक्रिया सुरु झाली आहे़, परंतु पहिल्याच दिवशी या भरतीला तीनशेहून अधिक जणांनी दांडी मारली़ त्यात आता मूळ कागदपत्रे सादर करु न शकलेली व प्रवेशपत्र उशिरा मिळाल्यामुळे गैरहजर राहिलेल्या अपात्र उमेदवारांना पुन्हा ९ जून रोजी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे़
६ व ७ जून रोजी उमेदवारांना शारीरिक व कागदपत्रे पडताळणीकरिता बोलाविण्यात आले होते, परंतु काही उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या दिवशी काही मूळ कागदपत्रे सादर न केल्याने त्यांना पोलिस भरतीसाठी अपात्र ठरविण्यात आले होते़ त्यात आता अशा उमेदवारांकडे जर ती मूळ प्रमाणपत्रे उपलब्ध असल्यास त्यांची प्रकरणे पोलिस भरती मंडळापुढे ठेवण्यात येणार आहेत़ पोलिस भरती मंडळाच्या अंतिम निर्णयानुसार, पुढील कार्यवाही करण्यात येईल़ प्रमाणपत्रे उपलब्ध असल्यास त्यांनी अपात्रतेचे पत्र (रिजेक्शन स्लीप) सह ९ जून रोजी सकाळी ८ वाजता पोलिस मुख्यालय येथे हजर रहावे़ भरती वेळापत्रकाची माहिती मोबाईलवर व प्रवेशपत्र मिळाले नसेल किंवा उशिराने मिळाले असेल त्यामुळे भरतीला हजर राहू शकले नाही़, अशा उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह, अॅडमीट कार्ड व आॅनलाईन आवेदन अर्जाच्या प्रतीसह ९ रोजी पहाटे ५ वा़मुख्यालयात हजर राहण्याचे आवाहन केले़ (प्रतिनिधी)