शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
4
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
5
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
6
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
7
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
8
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
9
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
10
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
11
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
12
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
13
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
14
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
15
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
16
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
17
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
19
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
20
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नातील घर मिळविण्याची संधी!

By admin | Updated: September 26, 2014 01:56 IST

औरंगाबाद : बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य क्रेडाई या बांधकाम संघटनेतर्फे ‘ड्रीम होम-२०१४’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

औरंगाबाद : बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य क्रेडाई या बांधकाम संघटनेतर्फे ‘ड्रीम होम-२०१४’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्या हस्ते आज सकाळी थाटात उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन २९ सप्टेंबरपर्यंत चालणार असून, औरंगाबादकरांना आपल्या स्वप्नातील घर विकत घेण्याची एक सुवर्णसंधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण घर खरेदी करतात. आकाशवाणी चौक येथील मोतीवाला स्क्वेअर एकाच छताखाली विविध सुविधा असलेले प्रदर्शन क्रेडाईतर्फे भरविण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्यास क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा, अध्यक्ष पापालाल गोयल, नितीन बगडिया, संजय कासलीवाल, सुनील पाटील, नरेंद्र जबिंदा, देवानंद कोटगिरे, जुगलकिशोर तापडिया, प्रमोद खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन रवी वट्टमवार यांनी केले, आभार बाळकृष्ण भाकरे यांनी मानले.प्रदर्शनात शहरातील ४७ नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी स्टॉल लावले असून, सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. २५ स्टॉलवर विविध वित्तीय संस्था व बँका नागरिकांना गृहकर्ज उपलब्ध करून देणार आहेत. तसेच काही सप्लायर्सनीही स्टॉल लावले आहेत. प्रदर्शनस्थळी २९ सप्टेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ७ वाजता वास्तुशास्त्राचे महत्त्व या विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनासाठी ओमिक्रॉन ग्रुप-प्लॅटिनम, शमित बिल्डकॉन-गोल्ड, सिल्व्हर विकास डेव्हलपर्स, अमृत डेव्हलपर्स व एचडीएफसी बँक आणि इंडिया प्रॉपर्टी डॉट कॉम- डिजिटल पार्टनर हे प्रायोजक आहेत. प्रदर्शनात नागरिकांनी सहभागी होऊन मनपसंत वास्तूचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन क्रेडाईचे अध्यक्ष पापालाल गोयल यांनी केले आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी अनिल मुनोत, सचिन वोहरा, प्रकाश मालखरे, जितेंद्र मुथा, सुयोग रुणवाल, विकास चौधरी, भास्कर चौधरी, संभाजी अतकरे, संग्राम पटारे, विजय सक्करवार, उदय कासलीवाल, सुनील बेदमुथा, सिद्धार्थ कांकरिया, प्रसाद पिंगळे आदी विशेष परिश्रम घेत आहेत.पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घ्या...मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बिल्डरांनी आपला प्रकल्प पूर्ण केल्यावर कम्प्लिशन (पूर्णत्वाचे प्रमाणपत्र) घेतले पाहिजे. शहर स्वच्छ, सुंदर असावे यादृष्टीनेही प्रयत्न करावेत. आयुक्तांनी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहनही केले.