आरोग्य विभागाच्या कारभाराचे आॅपरेशन
By Admin | Updated: June 23, 2016 01:27 IST2016-06-23T00:57:35+5:302016-06-23T01:27:43+5:30
औरंगाबाद : शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे याची काळजी घेण्याचे काम मनपाचे आहे. मात्र, मनपाचा आरोग्य विभाग काहीच काम करीत नाही.

आरोग्य विभागाच्या कारभाराचे आॅपरेशन
औरंगाबाद : शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे याची काळजी घेण्याचे काम मनपाचे आहे. मात्र, मनपाचा आरोग्य विभाग काहीच काम करीत नाही. वर्षानुवर्षे औषध फवारणी, अॅबेट ट्रीटमेंट होत नाही. पावसाळ्यात साथरोगांचा फैलाव होऊ नये यासाठी कोणत्याच उपाययोजना मनपातर्फे करण्यात आल्या नाहीत, आदी आरोप करून नगरसेवकांनी आरोग्य विभागाचेच आॅपरेशन केले.
बुधवारी स्थायी समितीची बैठक सुरू झाल्यावर आरोग्य विभागावर सविस्तर चर्चा सुरू झाली. प्रशासनाने पावसाळ्यासाठी कोणती तयारी केली, याची माहिती द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी सुरुवातीलाच नमूद केले की, आरोग्य विभागाला ३८५ कर्मचाऱ्यांची गरज असताना फक्त ८७ कर्मचारी काम पाहत आहेत. त्यांचे उत्तर ऐकून नगरसेवक अधिक संतप्त झाले.