आज लोकार्पण

By Admin | Updated: June 20, 2016 00:59 IST2016-06-19T23:35:59+5:302016-06-20T00:59:28+5:30

महावीर चौक, सिडको चौक या दोन्ही उड्डाणपुलांचे २० जून रोजी सकाळी १० वा. लोकार्पण करण्यात येणार आहे. मोंढानाका पुलाचेही लोकार्पण यानिमित्ताने होत आहे.

Opening Today | आज लोकार्पण

आज लोकार्पण

महावीर चौक, सिडको चौक या दोन्ही उड्डाणपुलांचे २० जून रोजी सकाळी १० वा. लोकार्पण करण्यात येणार आहे. मोंढानाका पुलाचेही लोकार्पण यानिमित्ताने होत आहे.
याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री रामदास कदम, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची उपस्थिती असेल.
आदित्य ठाकरे यांच्याकडे वैधानिक पद नसल्यामुळे त्यांचे नाव पत्रिकेत टाकण्यावरून प्रोटोकॉल मुद्दा निर्माण झाला असला तरी शिवसेना त्याला न जुमानता त्यांच्याच हस्ते पुलांचे लोकार्पण करणार आहे.
या पुलांच्या कामांना जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून अभियंत्यांच्या बदल्यांमुळे उपअभियंत्यांवरच या पुलांच्या कामांची जबाबदारी आली. उपअभियंता उदय भरडे यांनी पुलांवर काम केले. तिन्ही पुलांवर १०९ कोटी खर्च झाला.

Web Title: Opening Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.