शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

उद्घाटन वादावरील पडदा उठेना; २३ डिसेंबरचा कार्यक्रमही अनिश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:46 PM

१०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन, शहर बससेवा, एसटीपीच्या लोकार्पणास शिवसेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना निमंत्रित केल्यामुळे महापालिकेच्या राजकारणात सेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावरील पडदा अजून काही उठेना.

ठळक मुद्दे रस्त्यांचा नारळ मुख्यमंत्री फोडणार : ठाकरेंच्या हस्ते एसटीपी, बसच्या औपचारिक लोकार्पणाची शक्यता

औरंगाबाद : १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन, शहर बससेवा, एसटीपीच्या लोकार्पणास शिवसेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना निमंत्रित केल्यामुळे महापालिकेच्या राजकारणात सेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावरील पडदा अजून काही उठेना. शिवसेनेने दोन पावले मागे घेऊन १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि एसटीपी, बससेवेचे लोकार्पण २३ डिसेंबर रोजी ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला असला तरी तो कार्यक्रमही अद्याप अनिश्चित आहे.महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडून शिवसेना आणि भाजप नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते म्हणाले, रस्त्यांच्या भूमिपूजनात तांत्रिक अडचण आली आहे. कंत्राटदारांच्या वादामुळे रस्त्यांचे भूमिपूजन लांबण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांची वेळ आधीच घेतलेली असल्याने रविवारी २३ तारखेला शहर बससेवा व कांचनवाडीतील एसटीपीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाईल.बुधवारी महापालिकेच्या शिष्टमंडळाची भेट मुख्यमंत्र्यांनी टाळल्याने गुरुवारी दिवसभर सेना विरुद्ध भाजप, असे दोन गट पालिकेत होते. १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन करण्यासाठी जानेवारीत मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तो कार्यक्रम घ्यावा लागेल, अन्यथा मोठ्या आर्थिक विवंचनेला मनपाला सामोरे जावे लागेल, असा गर्भित इशारा भाजपने सेनेला दिला आहे.खा.चंद्रकांत खैरे यांनीच २३ डिसेंबर रोजी तिन्ही कार्यक्रमांचे भूमिपूजन होणार असल्याचे जाहीर करून ठाकरे येणार असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांची वेळ घेणे गरजेचे होते. मात्र, शिवसेनेने त्याला महत्त्व दिले नाही. परिणामी भाजप आणि शिवसेनेत राजकीय वाद पेटला. भाजपची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सेना-भाजपचे शिष्टमंडळ बुधवारी मुंबईला गेले; परंतु ते शिष्टमंडळ मुख्यंमत्र्यांना भेटू शकले नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रस्त्यांचे भूमिपूजन करण्यासाठी येता येईल, असा निरोप मुख्यमंत्र्यांनी महापौरांपर्यंत भाजप नेत्यांपर्यंत पोहोचविला.प्रशासनावर भाजपचा दबाव?जीएसटीचा तिढा सुटेपर्यंत काम सुरू न करण्याची कंत्राटदारांची भूमिका आहे. जीएसटीचे नाव पुढे करून प्रशासनावर भाजप वरिष्ठ पातळीवरून दबाव आणत असल्याची चर्चा आहे. १०० कोटींच्या रस्त्यांत जीएसटीची टक्केवारी अचानक वाढलेली नाही. जीएसटी नियमाप्रमाणेच आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक तरी मोठे भूमिपूजन शहरात व्हावे, अशी भूमिका भाजपची असल्यामुळे कंत्राटदार, जीएसटीचा वाद जन्माला घालण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान महापौर म्हणाले, अद्याप जीएसटीचा वाद मिटला नसल्याचे कळले आहे. त्यामुळे १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वेळेनुसार होईल.बस येण्यात पासिंगची अडचण२३ तारखेलाच पाच बस मनपात येण्यात पासिंगची अडचण आहे. त्यामुळे बस येण्याची शक्यता कमी आहे. महापौरांनी अतिरिक्त आयुक्त संतोष कवडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत शहरात बस येतील, असे दबावात बोलल्याप्रमाणे सांगितले. जर बस त्या दिवशी उशिराने आल्या तर मोठे संकट उभे राहील. त्यामुळे २२ डिसेंबरपर्यंत बस आल्याच पाहिजेत, असे महापौरांनी कंपनीच्या प्रतिनिधींना फोनवरून सांगितले.प्रदेशाध्यक्षांचे मौनभाजप प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांना १०० कोटींच्या रस्ते कामाचे भूमिपूजन तरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जावे. याबाबत तुमचे मत काय, यावर खा.दानवे यांनी काहीही प्रतिक्रिया न देता रामनगर येथून काढता पाय घेतला.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा