पारडगाव रेल्वे स्थानक उघड्यावर
By Admin | Updated: July 16, 2014 01:26 IST2014-07-16T00:04:33+5:302014-07-16T01:26:27+5:30
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील रांजणी व पारडगाव येथे स्वातंत्र्यकाळापासून रेल्वे थांबा आहे. नांदेड ते मनमाड लोहमार्गावर पारडगाव सर्व पॅसेंजर गाड्या थांबतात.

पारडगाव रेल्वे स्थानक उघड्यावर
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील रांजणी व पारडगाव येथे स्वातंत्र्यकाळापासून रेल्वे थांबा आहे. नांदेड ते मनमाड लोहमार्गावर पारडगाव सर्व पॅसेंजर गाड्या थांबतात. परंतु येथे प्रवाशांसाठी कोणतीही सुविधाा मिळत नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात स्थानकाची एकमेव खोलीचा काही भाग पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना झाडाखाली थांबावे लागते.
अनंत अडचणीतच तिकिटाची विक्री करावी लागते आहे. स्थानकावर लाईट नाही, महिलांसाठी स्वच्छालयाची व्यवस्था दररोज विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. पारडगावात बस येत नसल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे रेल्वे. पंरतु व्यापारी वर्गासही विद्यार्थ्यांची सुविधेअभावी मोठी अडचण निर्माण झाली आहे. या मतदार संघाचे खा. बंडू जाधव यांनी स्थानकाच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा प्रवाशांतून होत आहे.
अनेक लोकप्रतिनिधींकडे रेल्वे स्थानकातील असुविधांबाबत निवेदन दिली. परंतु उपयोग होत न नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अधिकारीही रेल्वे स्टेशनवर सुविधा देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने प्रवास करावा लागतो. स्टेशनकडे येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने तेथे दुचाकी गाडी येत नाही. खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना चालणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे अनेक प्रवाशाची रेल्वे चुकते. पारडगाव येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सर्व सुविधा देण्यात याव्यात, रेल्वे स्थानकावर येण्यासाठी रस्ता डांबरीकरण करावे, महिलांसाठी स्वच्छतागृह बांधावे, रेल्वे स्थानकावार विद्युत दिव्यांची व्यवस्था रेल्वे विभागाने करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यकाळापासून थांबा असून सुध्दा आजपर्यंत स्थानकाचा काडीचाही विकास झालेला नाही. ही वास्तव परिस्थिती आहे. रेल्वे विभाग या स्थानकाकडे कायम दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. पारडगाव येथे मराठवाड्यातील सर्वात मोठा गुरांचा बाजार भरतो. अनेक व्यापारी रेल्वेने येथे दर आठवड्यास येतात. मात्र गैरसोयींमुळे त्यांच्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
मूलभूत सुविधांमुळे नागरिकांची गैरसोय, रेल्वे रुळ वाढविण्याची मागणी
पारडगाव ते रेल्वे स्टेशन हा रस्ता २ किलोमीटर आहे. परंतु रस्ता खराब असल्याने हे अंतर पार करायला मोठी अडचण नागरिकांसमोर आहे. त्यातच वृद्ध प्रवाशांना याचा मोठा त्रास होत आहे.स्थानकास जोडणारा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. एकच रेल्वे ट्रॅक असल्याने रेल्वे जास्त वेळ थांबत नाही. तरी दुहेरी रेल्वे मार्ग टाकून प्रवाशांचे होणारे हाल थांबविण्याची मागणी पारडगाव, रांजणी आणि परिसरातील नागरिक व्यापारी, विद्यार्थी यांच्या वतीने करण्यात आली आहे.