शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाचे पुस्तके पडून

By admin | Updated: December 17, 2015 23:58 IST

परभणी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने विविध अभ्यासक्रमांची पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत अद्याप पोहचली नाहीत़

परभणी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने विविध अभ्यासक्रमांची पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत अद्याप पोहचली नाहीत़ ही पुस्तके पोस्ट कार्यालय आणि बसस्थानकावर पडून असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे़ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जातात़ जे विद्यार्थी नियमित अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहेत़ त्यामुळे मागील काही वर्षांपासून मुक्त विद्यापीठामार्फत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे़ मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठामधून पुस्तके पुरविले जातात़ ही पुस्तके त्या त्या जिल्ह्यातील व तालुक्यातील अभ्यासक्रेंदावरून यापूर्वी दिली जात होती़ मात्र यावर्षी विद्यापीठाने पुस्तके वाटप करण्याच्या पद्धतीत बदल केला़ थेट विद्यार्थ्यांच्या पत्त्यावर ही पुस्तके देण्याचा निर्णय घेतला़ त्यासाठी पोस्ट कार्यालय आणि खाजगी कुरीअर एजन्सीचा वापर पुस्तके वाटपासाठी करण्यात आला़ परंतु, पुस्तकांची संख्या आणि खाजगी एजन्सी व पोस्ट कार्यालयातील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ही पुस्तके अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचली नाहीत़ विद्यार्थ्यांना स्वत:हून बसस्थानकावरील कुरीअर एजन्सी व पोस्ट कार्यालयात जाऊन पुस्तके प्राप्त करून घ्यावी लागत आहेत़ या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोेंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे़ परभणी शहरामध्ये मुक्त विद्यापीठाची चार केंद्र आहेत़ याशिवाय तालुक्याच्या ठिकाणीही अभ्यास केंद्र आहेत़ या केंद्रांमधून विद्यार्थ्यांनी पदवी, पदव्युतर अभ्यासक्रमाची नोंदणी केली आहे़ या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणे अपेक्षित असताना अद्याप अनेक विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत़ त्यामुळे विद्यार्थ्यांची ओरड वाढली आहे़ (प्रतिनिधी)