शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
4
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
5
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
6
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
7
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
8
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
9
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
10
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
11
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
12
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
13
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
14
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
15
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
16
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
17
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
18
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
19
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
20
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘एसईबीसी’ऐवजी ‘खुला’; ‘आयटीआय’ प्रवेशासाठी मराठा आरक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 17:15 IST

दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन अर्ज मागविले होते.

ठळक मुद्देप्रवेशफेरीला ३ डिसेंरपासून सुरुवात 

औरंगाबाद : ‘आयटीआय’ची पहिली प्रवेशफेरी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे संपूर्ण प्रवेशप्रक्रियाच ठप्प झाली होती. तथापि, ज्या विद्यार्थ्यांनी ‘आयटीआय’साठी ‘एसईबीसी’ प्रवर्गातून ऑनलाईन अर्ज केले होते. त्यांनी आपल्या अर्जात खुला प्रवर्ग अशी दुरुस्ती करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. 

दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन अर्ज मागविले होते. त्यानुसार उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी पहिल्या फेरीसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, ९ ते १४ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित करण्यात आले होते. 

मराठवाड्यातील शासकीय व खाजगी ‘आयटीआय’मध्ये एकूण १९ हजार ३४४ प्रवेशक्षमतेपैकी पहिल्या फेरीत ३ हजार ५८४ प्रवेश झाले होते. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली; परंतु मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करताना तो ‘एसईबीसी’ या प्रवर्गातून केला होता. त्यामुळे दुसरी फेरी स्थगित करण्यात आली होती. आता राज्य शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ‘आयटीआय’साठी ऑनलाईन अर्जात दुरुस्ती करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ज्या उमेदवारांनी ‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज केला असेल, त्यांनी प्रवेश अर्जात खुला प्रवर्ग अशी दुरुस्ती करायची आहे. 

प्रवेशफेरीला ३ डिसेंरपासून सुरुवात दुसऱ्या प्रवेशफेरीला ३ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवड यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाणार असून ४ डिसेंबर रोजी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. ५ ते ८ डिसेंबरदरम्यान निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व प्रवेशनिश्चित केला जाणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी ११ डिसेंबर रोजी संस्था व निवड यादी जाहीर केली जाईल. १२ ते १५ डिसेंबरदरम्यान तिसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत. १२ ते १५ डिसेंबर दरम्यान, चौथ्या फेरीसाठी विकल्प सादर करता येतील. १८ डिसेंबर रोजी चौथ्या फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची संस्था व व्यवसायनिहाय यादी जाहीर होईल. चौथ्या प्रवेशफेरीअखेर रिक्त जागांवर समुपदेशनाद्वारे २९ व ३० डिसेंबर रोजी प्रवेश दिले जाणार आहेत. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादiti collegeआयटीआय कॉलेजStudentविद्यार्थी