शिक्षेचे प्रमाण वाढले तरच गुन्हेगार परावृत्त होतील
By Admin | Updated: August 5, 2015 00:32 IST2015-08-05T00:16:44+5:302015-08-05T00:32:40+5:30
जालना : पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यात खऱ्या गुन्हेगारांना कोर्टात शिक्षा झाली तरच अन्य गुन्हेगार गुन्हे करण्यापासून परावृत्त होतील,

शिक्षेचे प्रमाण वाढले तरच गुन्हेगार परावृत्त होतील
जालना : पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यात खऱ्या गुन्हेगारांना कोर्टात शिक्षा झाली तरच अन्य गुन्हेगार गुन्हे करण्यापासून परावृत्त होतील, असा विश्वास औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला.
जालना येथे गुन्ह्यांसंबधी मंगळवारी त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर जिल्हाभरातून आलेल्या शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम आदींची उपस्थिती होती.
ते म्हणाले की, पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यात कोर्टात शिक्षा होण्याचे प्रकार १५ ते १६ टक्केच आहे. अलिकडच्या काळात हे प्रमाण २० टक्क्यांवर गेले आहे. आता प्रत्येक महिन्याला चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना रँक मिळणार आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास योग्य प्रकारे करून त्या गुन्ह्यात गुन्हेगाराला शिक्षा मिळेल. असे भक्कम पुरावे गोळा करणे गरजेचे आहे. कोर्टात गुन्हेगारांना शिक्षा झाली की अन्य गुन्हेगार तसे गुन्हे करण्यापासून परावृत्त होईल. यावेळी पोलिस दलात चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच पोलिसांना मदत करणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, तसेच शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.