शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

दिवाळीमुळे आॅनलाईन सर्व्हर ओव्हरलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:11 IST

दिवाळीच्या तोंडावर तरी बँकांमध्ये ‘रोख’ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे होते; मात्र बाजारात नोटांचा तुटवडा असण्यास ८ नोव्हेंबर रोजी २ वर्षे पूर्ण होत असून, आजवर नोटाबंदीचा फटका जाणवू लागला आहे.

ठळक मुद्देस्वाईप मशीन ठप्प : शासकीय व्यवहारांचे ई-ट्रान्झॅक्शन रखडले

औरंगाबाद : दिवाळीच्या तोंडावर तरी बँकांमध्ये ‘रोख’ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे होते; मात्र बाजारात नोटांचा तुटवडा असण्यास ८ नोव्हेंबर रोजी २ वर्षे पूर्ण होत असून, आजवर नोटाबंदीचा फटका जाणवू लागला आहे. ८ नोव्हेंबर २०१६ प्रमाणेच नागरिकांना यंदाच्या दिवाळसणात पैशांसाठी वणवण करण्याची वेळ आली.ई-व्यवहाराचा बोलबाला करीत शासनाने नागरिकांना स्वाईप मशीनच्या दिशेने नेल्यामुळे दोन वर्षांपासून सर्वांचीच आॅनलाईन खरेदीवर झुंबड पडते आहे. दिवाळसणात स्वाईप मशीन हँग झाल्याने बँकांचे सर्व्हर ओव्हरलोड होऊन बंद पडले. पेटीएम, बँकांच्या अ‍ॅप्सवरही याचा परिणाम झाला. रोख रकमेच्या शोधार्थ नागरिकांची पावले बँकेच्या काऊंटरकडे वळली.बँकांचे सर्व्हर हॅक झाल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. बँकांकडून मात्र याबाबत काहीही खुलासा, अथवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नव्हते. या सगळ्याचा परिणाम म्हणून सरकारी यंत्रणेतील रक्कम हस्तांतरित (ट्रान्झॅक्शन) करण्याच्या व्यवहारांना ब्रेक लागला. दिवाळीमुळे रक्कम संबंधितांना देण्यासाठी सर्व्हरवरून आरटीजीएस अथवा ई-ट्रान्झॅक्शन करण्याची कामे खोळंबली. वेगवेगळ्या शासकीय व्हॉटस्अ‍ॅप गु्रपमध्ये सर्व्हर हॅक झाल्याचे एसएमएस फिरत होते. संगणकावर आॅनलाईन व्यवहार सुरू असताना वेबसाईटवरून येणारे एसएमएस पुरावे म्हणून लेखा विभागातून टाकण्यात येत होते. सार्वजनिक बांधकाम विभागातील यंत्रणेची मंगळवारी पूर्ण दिवसभरात गाळण उडाली होती.महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी मुकुंद वसेकर म्हणाले, सर्व्हर हॅक वैगेरे झाले नसावे. हा ओव्हरलोडचा प्रकार आहे. दिवाळीमुळे स्वाईप मशीनच्या आधारे खरेदीचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे सर्व्हरवर लोड येऊन ते डाऊन झाले असेल. उद्यापर्यंत सर्व्हर सुरळीत होईल, असा अंदाज आहे. प्रत्येक बँकांचे वेगवेगळे प्रोजेक्ट कन्सल्टंट आहेत. त्यामुळे नेमकी तांत्रिक अडचण कुठे आली, हे समजण्यास मार्ग नाही.बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे मत असेमहाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, सिस्टिममध्ये व्हायरस किंवा बग नव्हता; मात्र ट्रान्झॅक्शन फेल्युर रिपोर्ट येत होते. दिवाळीमुळे मोठ्या प्रमाणात ई-व्यवहार होणार हे गृहीत धरून सर्व्हरची क्षमता वाढविली नसावी. त्यामुळे सर्व्हर ओव्हरलोड होऊन डाऊन झाले असेल.नोटाबंदीची दोन वर्षे८ नोव्हेंबर २०१६ रोजी ऐन दिवाळसणात केंद्र शासनाने देशभरातील जुने चलन बंद करून नवीन चलन बाजारात आणल्याची घोषणा केली होती. त्या घटनेला ८ नोव्हेंबर २०१८ रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Internetइंटरनेट